भारताचा दबाव; ब्रिटनची राणी घालणार नाही कोहिनूरजडित मुकुट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 10:47 AM2023-02-16T10:47:47+5:302023-02-16T10:48:53+5:30

संबंध बिघडण्याची भीती असल्याने शतकापूर्वीचा जुना मुकुट घालणार

Pressure from India; The Queen of Britain will not wear a crown with elbows! | भारताचा दबाव; ब्रिटनची राणी घालणार नाही कोहिनूरजडित मुकुट!

भारताचा दबाव; ब्रिटनची राणी घालणार नाही कोहिनूरजडित मुकुट!

googlenewsNext

लंडन : गेल्या सप्टेंबरमध्ये राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर यावर्षी ६ मे रोजी राजे चार्ल्स (तृतीय) यांचा अधिकृतपणे राज्याभिषेक होईल. विशेष म्हणजे या सोहळ्यात ब्रिटनची नवीन महाराणी किंग चार्ल्स यांची पत्नी कॅमिला राज्याभिषेकादरम्यान राणी एलिझाबेथ यांचा कोहिनूरजडित मुकुट परिधान करणार नाहीत. लंडनमधील बकिंगहॅम पॅलेसने मंगळवारी याची घोषणा केली. भारतासोबतचे संबंध बिघडू नयेत, हे लक्षात घेऊन राजघराण्याने हा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

मुकुटाची डागडुजी सुरू...
n या निर्णयानंतर कॅमिलासाठी क्वीन मेरी यांच्या १०० वर्षांपूर्वीच्या मुकुटाची डागडुजी करण्यात येत आहे. 
n कॅमिला यांना अधिकृतपणे राणीचा 
दर्जा देण्याचा कार्यक्रमही ६ मे रोजीच होणार आहे.  यावेळी त्या क्वीन मेरी यांचा मुकुट घालतील.

द इम्पिरिअल स्टेट क्राउन : ‘कोहिनूर’ हिरा हा राजा जॉर्ज सहावा यांच्या पत्नी राणी एलिझाबेथ यांच्या मुकुटात जडलेला होता. तेव्हापासून हा हिरा ब्रिटिश महाराणींच्या मुकुटाशी जोडला गेला. या ताजला ‘द इम्पिरिअल स्टेट क्राउन’ म्हणतात.

‘क्वीन कॉन्सर्ट’ म्हणून नवी ओळख

राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी केलेल्या घोषणेनुसार ७५ वर्षीय कॅमिला ‘राणी कॉन्सर्ट’ म्हणून ओळखल्या जातील. त्या राजे चार्ल्स यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. राजकुमारी डायना यांच्या मृत्यूनंतर चार्ल्स यांनी कॅमिला यांच्याशी लग्न केले. राज्याभिषेकानंतर, कॅमिला यांना कोणत्याही प्रकारची घटनात्मक ताकद नसेल, मात्र त्यांची पदवी ब्रिटनची महाराणीच राहणार आहे.

१०५.६ कॅरेट  कोहिनूर हिरा

तो जगातील सर्वांत सुंदर हिऱ्यांपैकी एक आहे. आंध्र प्रदेशातील गोलकुंडा खाणीत हा हिरा सापडला आहे.

₹८,०००काेटी 
किंमत या हिऱ्याची असण्याचा अंदाज लावण्यात आला आहे.

कोहिनूरच्याच 
किमतीत सोने खरेदी 
करण्याचा विचार केला 
तर ५० लाख रुपये 
प्रतिकिलोप्रमाणे आपण
१६०० किलो सोने 
खरेदी करू शकतो.

भारतासह अनेक देशांचा ‘कोहिनूर’वर दावा
राणी एलिझाबेथ यांचा मुकुट कोहिनूर व आफ्रिकेतील ग्रेट स्टारसह जगातील अनेक मौल्यवान हिरे आणि दागिन्यांनी जडलेला आहे.  भारताने ब्रिटनसमोर अनेकवेळा कोहिनूर हिऱ्यावर कायदेशीर हक्क सांगितला आहे. भारताप्रमाणेच द. आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्ताननेही या हिऱ्यावर दावा केला आहे.


 

Web Title: Pressure from India; The Queen of Britain will not wear a crown with elbows!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.