'SEX' टाळण्यासाठी पत्नीने पतीला जेवणातून दिले विष

By admin | Published: March 3, 2017 12:30 PM2017-03-03T12:30:21+5:302017-03-03T12:30:21+5:30

वैवाहिक आयुष्यात प्रेमाबरोबर सेक्स सुद्धा महत्वाचे आहे. सेक्स ही सुध्दा प्रेम व्यक्त करण्याची एक भावना आहे.

To prevent 'SEX', the wife has given her husband's poison | 'SEX' टाळण्यासाठी पत्नीने पतीला जेवणातून दिले विष

'SEX' टाळण्यासाठी पत्नीने पतीला जेवणातून दिले विष

Next

 ऑनलाइन लोकमत 

वॉशिंग्टन, दि. 3 - वैवाहिक आयुष्यात प्रेमाबरोबर सेक्स सुद्धा महत्वाचे आहे. सेक्स ही सुध्दा प्रेम व्यक्त करण्याची एक भावना आहे. सुखी वैवाहिक आयुष्यासाठी सेक्स जसे महत्वाचे आहे तसेच अतिसेक्स वैवाहिक सुख बिघडवण्यासाठीही कारणीभूत ठरते. त्यामुळे पती-पत्नीमध्ये संवाद, समन्वय आणि जोडीदाराला समजून घेणे आवश्यक आहे. 
 
काहीवेळा एक जोडीदार दुस-याला समजून घेत नाही तिथून पती-पत्नीचे संबंध बिघडण्यास सुरुवात होते. सेक्स संदर्भातील समस्या असतील तर पती-पत्नी दोघांनी सामंजस्याने त्यावर तोडगा काढला पाहिजे. अन्यथा दिशा भरकटत जाते आणि काहीवेळा हातून एखादा गुन्हा देखील घडतो. 
 
अमेरिकेत एका महिलेने पतीबरोबर सेक्स टाळण्यासाठी चक्क त्याला जेवणातून विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. अँड्रीय हीमींग (49) असे या दोषी महिलेचे नाव असून मागच्या दोन वर्षांपासून ती फरार आहे. अँड्रीया नव-याबरोबर सतत सेक्स करुन कंटाळली होती. 
 
यातून कायमची सुटका करुन घेण्यासाठी म्हणून तिने नव-याच्या जेवणात आणि एनर्जी ड्रींकमध्ये बोरीक अॅसिड मिसळले. सुदैवाने या विषप्रयोगातून अँड्रीयाच नवरा बचावला. पण विविध शारीरीक व्याधींनी तो आजारी आहे. तपास यंत्रणांनी अँड्रीया मेक्सिकोला पळून गेल्याची शक्यता व्यक्त केलीय.  
 

Web Title: To prevent 'SEX', the wife has given her husband's poison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.