आईसलँडमधील पेट्रोलची किंमत पाहून गाssर पडाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 01:34 PM2018-06-20T13:34:47+5:302018-06-20T13:34:47+5:30
गेल्या महिन्यात पेट्रोल दरवाढीमुळे भारतीय जनता होरपळली होती
मुंबई: गेल्या महिन्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली होती. या दरवाढीनं सामान्य जनता चांगलीच होरपळली होती. त्यानंतर इंधनाच्या दरात होणारी वाढ थांबली आणि लोकांना काहीसा दिलासा मिळाला. गेल्या दोन आठवड्यांमध्ये पेट्रोल, डिझेलच्या दरात घट झाली. यामुळे सर्वसामान्यांना हायसं वाटलं. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढू लागताच भारतीयांचं महिन्याचं आर्थिक गणित कोलमडू लागतं. मात्र जगातील अनेक देशांमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर भारतापेक्षा जास्त आहेत.
आज मुंबईत पेट्रोलचा दर 84.06 रुपये प्रति लिटर इतका आहे. तर एक लिटर डिझेलसाठी 72.13 रुपये मोजावे लागत आहेत. दोन आठवड्यांपूर्वी मुंबई पेट्रोलचा दर 86 रुपयांच्या वर गेला होता. मात्र हळूहळू दररोज काही पैशांनी पेट्रोल स्वस्त झालं. सध्या फुटबॉलचा फिव्हर जोरात आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या काही देशांमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी 100 पेक्षा अधिक रुपये मोजावे लागतात. आईसलँड या थंड प्रदेशातील देशात पेट्रोलची किंमत तब्बल 141.96 रुपये आहे. तर डेन्मार्कमध्ये पेट्रोलसाठी 126.95 रुपये मोजावे लागतात. सध्या 32 देश फिफा वर्ल्ड कपम खेळत आहेत. या देशांपैकी इराणमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल मिळतं. इराणमध्ये पेट्रोलचा दर 19.11 रुपये इतका आहे.
फुटबॉल विश्वचषकात सहभागी झालेल्या देशांमधील पेट्रोल दर:
आईसलँड- 141.96 रुपये
डेन्मार्क - 126.95 रुपये
पोर्तुगाल- 124.90 रुपये
फ्रान्स- 122.17 रुपये
स्वीडन- 119.44 रुपये
बेल्जियम- 117.39 रुपये
जर्मनी- 116.71 रुपये
इंग्लंड- 116.03 रुपये
क्रोएशिया- 111.25 रुपये
स्वित्झर्लंड- 111.25 रुपये
उरुग्वे- 109.20 रुपये
स्पेन- 104.42 रुपये
सर्बिया- 103.06 रुपये
दक्षिण कोरिया- 99.65 रुपये
पोलंड- 93.50 रुपये
जपान- 92.14 रुपये
सेनेगल- 83.95 रुपये
ब्राझील- 83.27 रुपये
कोस्टारिका- 81.90 रुपये
मोरोक्को- 81.22 रुपये
पेरु- 75.08 रुपये
ऑस्ट्रेलिया- 74.39 रुपये
अर्जेंटिना- 68.25 रुपये
मेक्सिको- 67.57 रुपये
पनामा- 61.43 रुपये
कोलंबिया- 55.28 रुपये
रशिया- 48.46 रुपये
ट्युनेशिया- 48.46 रुपये
सौदी अरेबिया- 36.86 रुपये
इजिप्त- 29.35 रुपये
नायजेरिया- 28.67 रुपये
इराण- 19.11 रुपये