पंतप्रधान नेत्यानाहूंनी टोचली कोरोनाची लस, देशभरात होणार लसीकरण
By महेश गलांडे | Published: December 20, 2020 09:12 AM2020-12-20T09:12:55+5:302020-12-20T09:14:00+5:30
इस्रायलमध्ये आजपासून फ्रंट फूटवर काम करणाऱ्या म्हणजेच आरोग्य खात्याशी संबंधित व्यक्तींना लस टोचण्यास सुरुवात होत आहे. नर्सिंग होममधील स्टाफ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्यक्रमाने ही लस टोचण्यात येणार आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी कोरोनापासून बचावासाठी लसीकरण केले. इस्रायलमध्ये सर्वात पहिली लस नेत्यानाहू यांना टोचण्यात आली असून इथून पुढे देशभरात ही लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. नेत्यानाहू यांना लस देतानाचे व्हिडिओ चित्रीकरण टेलिव्हीजनवर लाईव्ह दाखविण्यात आले होते. जगातील काही निवडक नेत्यांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे, त्यामध्ये नेत्यानाहू यांचा समावेश झाला आहे.
इस्रायलमध्ये आजपासून फ्रंट फूटवर काम करणाऱ्या म्हणजेच आरोग्य खात्याशी संबंधित व्यक्तींना लस टोचण्यास सुरुवात होत आहे. नर्सिंग होममधील स्टाफ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्यक्रमाने ही लस टोचण्यात येणार आहे. देशातील नागरिकांचा लसीकरणावरील विश्वास वाढावा आणि मनातील भीती दूर व्हावी, यासाठी पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी सर्वप्रथम लस टोचून घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
Netanyahu receives Covid-19 vaccine jab, kickstarts vaccination drive in Israel
— ANI Digital (@ani_digital) December 19, 2020
Read @ANI Story | https://t.co/buqIqIdRBapic.twitter.com/iKcbprgRXe
लसीकरण केल्यानंतर नेत्यानाहू यांनी हा सर्वात आनंदी क्षण असल्याचे म्हटले. तसेच, लवकरच इस्रायलमध्ये सर्वकाही पूर्वीप्रमाणे सुरू होईल, असे आश्वासनही नागरिकांना दिले.