इंग्रजी न येणा-या मुस्लीम महिलांना मायदेशात धाडणार - पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन
By admin | Published: January 18, 2016 07:18 PM2016-01-18T19:18:54+5:302016-01-18T19:21:56+5:30
इंग्रजीच्या परीक्षेत पास न होणा-या मुस्लीम महिलांना त्यांच्या देशात परत धाडण्यात येणार असल्याचं इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी सांगितलं आहे. या देशात रहायचं असेल
Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. १८ - इंग्रजीच्या परीक्षेत पास न होणा-या मुस्लीम महिलांना त्यांच्या देशात परत धाडण्यात येणार असल्याचं इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी सांगितलं आहे. या देशात रहायचं असेल तर इंग्रजी यावंच लागेल असं स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलं आहे. हा निर्णय कटोर आहे, परंतु इंग्रजी आलं तर अनेक संधी खुल्या होतात असं ते म्हणाले.
या निर्णयाचा फटका इंग्लंडमध्ये स्थलांतरीत झालेल्या सगळ्यांनाच बसणार असला तरी तज्ज्ञांच्या मते हा प्रश्न मुख्यत: मुस्लीमांना जाणवणार आहे. इंग्लंडमध्ये जवळपास १,९०,०० मुस्लीम महिलांना नीट इंग्रजी येत नाही, तर जवळपास ३८,००० जणींना इंग्रजीचा गंधही नाही. नव-यासोबत इंग्लंडमध्ये आल्यावर अडीच वर्षांमध्ये इंग्रजी शिकणं ही त्यांची जबाबदारी आहे, असं कॅमेरॉन बीबीसी रेडियो ४ च्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले. विश्ष म्हणजे असा जोडप्याला मूल जालं असेल तर ते मूल ब्रिटिश नागरीक असतं, त्यामुळे असं मूल आणि त्याचे वडील इंग्लंडमध्ये राहू शकतिल आणि आईला मात्र तिच्या मायदेशात परतावं लागेल. या प्रश्नी होणा-या प्रश्नांचा विचार करता, निश्चित काय होईल असे विचारले असता कॅमेरॉन यांनी इंग्रजी न येणा-यांना या देशात राहता येईल याची हमी मिळणार नाही असे सांगितले.