प्राइम मिनिस्टर मोदी इज द बॉस! ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांचे गौरवोद्गार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 06:17 AM2023-05-24T06:17:49+5:302023-05-24T06:18:31+5:30

सिडनी : प्राइम मिनिस्टर मोदी इज द बॉस, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र  मोदी ...

Prime Minister Modi is the boss! Tribute to Prime Minister Albanese of Australia | प्राइम मिनिस्टर मोदी इज द बॉस! ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांचे गौरवोद्गार

प्राइम मिनिस्टर मोदी इज द बॉस! ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीज यांचे गौरवोद्गार

googlenewsNext

सिडनी : प्राइम मिनिस्टर मोदी इज द बॉस, अशा शब्दांत ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांची जोरदार स्तुती केली. देशातील सर्वांत मोठ्या इनडोअर स्टेडियमपैकी एक असलेल्या कुडोस बँक एरिना येथे आयोजित भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे ऑस्ट्रेलियातील हजारो भारतीयांनी जोरदार स्वागत केले. अल्बानीज यांनी मोदी यांची स्तुती करताच उपस्थित भारतीयांना टाळ्यांचा एकच कडकडाट केला. 

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, परस्पर विश्वास आणि आदर हा भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांचा सर्वांत मजबूत आणि सर्वांत मोठा पाया आहे. नरेंद्र मोदी यांनी ब्रिस्बेनमध्ये भारतीय वाणिज्य दूतावास सुरू करण्याची घोषणाही या कार्यक्रमात केली. या कार्यक्रमाला ऑस्ट्रेलियाच्या विविध भागांतून आलेले २१,००० हून अधिक लोक उपस्थित होते.

भारतात क्षमता आणि टॅलेंट
n आयएमएफ भारताला जागतिक अर्थव्यवस्थेचे उज्ज्वल स्थान मानते हे अधोरेखित करून मोदी म्हणाले, जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, जर असा कोणताही देश असेल जो जागतिक संकटांना तोंड देत असेल, तर तो भारत आहे. 
n अत्यंत आव्हानात्मक काळातही भारताने विक्रमी निर्यात केली आहे. भारताकडे क्षमतेची कमतरता नाही, भारताकडे संसाधनांचीही कमतरता नाही, आज ज्या देशात जगातील सर्वांत मोठी आणि सर्वांत तरुण टॅलेंट फॅक्टरी आहे, तो देश म्हणजे भारत आहे.

नगराला नाव ‘लिटिल इंडिया’
या कार्यक्रमाला संपूर्ण देशातून भारतीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांचे आमगन होताच लोकांनी ‘मोदी-मोदी’ अशा जोरदार घोषणाही दिल्या. मोदी यांनी येथील एका उपनगराचे नाव ‘लिटिल इंडिया’ असे ठेवले. 

पंतप्रधान मोदी जिथे जातील तिथे त्यांचे रॉकस्टारसारखे स्वागत होते. अमेरिकन रॉकस्टार ब्रूस स्प्रिंगस्टीन यांचा याच ठिकाणी २०१७ मध्ये कार्यक्रम झाला होता. त्यांचेही इतके भव्य स्वागत झाले नव्हते. स्प्रिंगस्टीन यांना त्यांचे फॅन बॉस म्हणून संबोधतात.     - अँथनी अल्बानीज, पंतप्रधान, ऑस्ट्रेलिया

दोन्ही देशांचे संबंध दृढ करण्यासाठी भारतीय समुदायाने महत्त्वाची भूमिका बजावली. दोन्ही देशांमधील विमानांची संख्या वाढली असून, भविष्यात विमानांची संख्या आणखी वाढेल. परस्पर विश्वास व आदर हा या संबंधांचा सर्वांत मजबूत आणि सर्वांत मोठा पाया आहे.     - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Web Title: Prime Minister Modi is the boss! Tribute to Prime Minister Albanese of Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.