पंतप्रधान मोदींचे मित्र पुतिन यांनी भारताला दिलं खास गिफ्ट, शत्रू देशांना लागेल मिरची
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 20:22 IST2025-01-28T20:21:26+5:302025-01-28T20:22:09+5:30
भारताची समुद्रातील ताकद आता आणखी वाढणार आहे. कारण आत्याधुनिक स्टेल्थ मिसाईल फ्रिगेट आयएनएस तुशील लवकरच भारतात येत आहे. तुशील ...

पंतप्रधान मोदींचे मित्र पुतिन यांनी भारताला दिलं खास गिफ्ट, शत्रू देशांना लागेल मिरची
भारताची समुद्रातील ताकद आता आणखी वाढणार आहे. कारण आत्याधुनिक स्टेल्थ मिसाईल फ्रिगेट आयएनएस तुशील लवकरच भारतात येत आहे. तुशील रशियातील कलिनिनग्राद येथून 17 डिसेंबर 2024 लाच भारतासाटी रवाना झाली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयएनएस तुशील फेब्रुवारीच्या मध्यात देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचणे अपेक्षित आहे. रशियामध्ये बनवलेले ही स्टेल्थ गाईडेड मिसाईल ९ डिसेंबर २०२४ रोजी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय नौदलात समाविष्ट केले आहे.
बनेल पश्चिम ताफ्याचा भाग -
आयएनएस तुशीलसंदर्भात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुंबईतील पश्चिम ताफ्याचा भाग होईल. महत्वाचे म्हणजे, आयएनएस तुशील भारतात पोहोचण्यापूर्वी पश्चिम आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून दूर गिनीच्या आखातात चाचेगिरीविरोधी गस्तही चालवेल, असेही अधिकाऱ्यांनी म्हटेल आहे.
काय आहे 'खासियत' -
तुशील हे प्रोजेक्ट ११३५.६ चे एक प्रगत क्रिव्हक III श्रेणीचे फ्रिगेट आहे आणि अशी सहा जहाजे आधीपासूनच सेवेत आहेत. यात सुमारे २६ टक्के स्वदेशी सामग्री आहे, जी मागील टेग-क्लासच्या फ्रिगेट्सच्या दुप्पट आहे. या युद्धनौकेसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, ब्रह्मोस एरोस्पेस (भारत-रशियन संयुक्त उपक्रम) आणि नोव्हा इंटिग्रेटेड सिस्टम्स (टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडच्या संपूर्ण मालकीची उपकंपनी) यांसह ३३ कंपन्यांनी योगदान दिले आहे.
आयएनएस तुशील चारही आयामांमध्ये (हवा, जमीन, पाण्याखालील आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक) नौदल युद्धाच्या संपूर्ण स्पेक्ट्रममध्ये निळ्या पाण्यातील ऑपरेशन्ससाठी डिझाइन करण्यात आले आहे. जे विविध प्रकारच्या प्रगत शस्त्रांस्त्रांनी सुसज्ज आहे. यात, ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र, लांब पल्ल्याचे जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र, प्रगत मध्यम पल्ल्याच्या हवाई आणि पृष्ठभागावरील तोफा, ऑप्टिकली नियंत्रित जवळच्या पल्ल्याच्या जलद फायर गन प्रणाली, टॉर्पेडो, रॉकेट आणि प्रगत इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि संप्रेषण संच, आदी.चा समावेश आहे.