पंतप्रधान मोदी आय लव्ह यू... चिमुकल्या मोशेने व्यक्त केल्या भावना

By admin | Published: July 5, 2017 06:28 PM2017-07-05T18:28:10+5:302017-07-05T19:27:39+5:30

इस्त्रायल दौऱ्याच्या दुस-या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 26/11 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सुखरुप बचावलेला चिमुकला मोशे याची भेट घेतली.

Prime Minister Modi's love for you! | पंतप्रधान मोदी आय लव्ह यू... चिमुकल्या मोशेने व्यक्त केल्या भावना

पंतप्रधान मोदी आय लव्ह यू... चिमुकल्या मोशेने व्यक्त केल्या भावना

Next

ऑनलाइन लोकमत 

जेरुसलेम, दि. 5 - इस्त्रायल दौऱ्याच्या दुस-या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 26/11 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सुखरुप बचावलेला चिमुकला मोशे याची भेट घेतली. त्या हल्ल्यावेळी मोशे अवघ्या 2 वर्षांचा होता. पंतप्रधानांच्या भेटीमुळे मोशे आनंदी होता. भेट घेतल्यावर पंतप्रधान मोदी आय लव्ह यू माझं तुमच्यावर आणि भारतीयांवर प्रेम आहे अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. 
 
2008 साली मुंबईतील खाबाद हाऊसवर झालेल्या हल्ल्यामध्ये मोशेचे आई-बाबा रिवका आणि गॅव्रिएल होल्टझबर्ग मारले गेले होते. मोशेची काळजी घेणारी दाई सॅंड्रा सॅम्युएल्स हिने त्याचे प्राण वाचवले होते. सॅंड्राच्या या धाडसी कृतीबद्द्ल इस्रायल सरकारने तिचा पुरस्कार देऊन सन्मानही केला होता. सँड्रा सॅमुअल्सही आता इस्त्रायलमध्येच राहतात. मोशेच्या भावपूर्ण शब्दांनंतर पंतप्रधान मोदींनीही तुला हवं तेव्हा तू भारतात येऊ शकतो तुला आणि तुझ्या कुटुंबियांना दिर्घकाळाचा व्हिसा देण्यात येईल असंही मोदींनी जाहीर करून टाकलं. 
(भारत आणि इस्रायलमध्ये 7 महत्त्वपूर्ण करार)
(भारत आणि इस्रायल संबंधांचं नवं पर्व)
(पृथ्वीतलावरच्या सर्वात सुरक्षित ठिकाणी मोदींचा मुक्काम)
पंतप्रधान मोदींच्या भेटीपूर्वी मोशे आनंदी होता, मोदींना भेटण्यासाठी तो खूप उत्साहित होता. आता मोशे त्याच्या आजी आजोबांबरोबर इस्रायलमध्ये राहतो. आता तो 11 वर्षांचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोशेच्या भेटीला येणार असल्याचे कळताच त्याचे आजी-आजोबा आनंदून गेले होते. "ज्यावेळेस भारतीय राजदुतांनी पंतप्रधान मोदी आमच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले तेव्हा माझा माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही. भारत आजही आमचे दुःख वाटून घेण्यास प्रयत्नशील असल्याचे पाहून आम्हाला फारच आनंद झाला" अशा शब्दांमध्ये मोशेचे आजोबा राबी शिमोन रोसेनबर्ग यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पाहा व्हिडीओ-
 

पृथ्वीतलावरच्या सर्वात सुरक्षित ठिकाणी मोदींचा मुक्काम-  यहा कोई परिंदा भी पर नही मार सकता हा हिंदी चित्रपटातला डायलॉग पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रायलमध्ये जिथे मुक्कामाला आहेत त्या ठिकाणाला तंतोतंत लागू पडतो. एरवी पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत अत्यंत काटेकोरपणे खबरदारी घेतली जाते. सुरक्षेच्या आघाडीवर छोटीशी चूक राहणार नाही याची एसपीजीकडून काळजी घेतली जाते. पण आता इस्त्रायलमध्ये मोदींच्या सुरक्षेची फारशी काळजी करण्याचे कारण नाही. मोदी किंग डेव्हीड हॉटेलच्या ज्या सूटमध्ये मुक्कामाला आहेत ते पृथ्वीवरचे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. संपूर्ण हॉटेलमध्ये बॉम्ब हल्ला किंवा केमिकल हल्ला झाला तरी, मोदींच्या सूटला किंचितही धक्का लागणार नाही. किंग डेव्हीड हॉटेलच्या सुरक्षेची जबाबदारी संभाळणा-या शेलडॉन रिटझ यांनी टाइम्स ऑफ इंडियाला ही माहिती दिली. मोदींच्या इस्त्रायल दौ-याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.

Web Title: Prime Minister Modi's love for you!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.