अमेरिकन सैन्य दलाच्या 'लीजन ऑफ मेरीट' पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान
By महेश गलांडे | Published: December 22, 2020 09:21 AM2020-12-22T09:21:47+5:302020-12-22T09:23:57+5:30
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी आपल्या ट्विटरमध्ये लिहिलंय की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लीजन ऑफ मेरीट पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे.
वॉशिंग्टन - पंतप्रधाननरेंद्र मोदींना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लीजन ऑफ मेरीट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. भारत आणि अमेरिकेतील भागिदारी आणि व्यवहार्यपूर्ण संबंधातील वद्धीसाठी केलेल्या नेतृत्वामुळे मोदींना हा पुरस्कार देण्यात आला आहे. अमेरिकेत भारतीय राजदूत संधु तरनजीत यांनी हा पुरस्कार स्विकार केला, कोरोनामुळे पंतप्रधान मोदींचा विदेश दौरा शक्य नसल्यामुळे अमेरिकेतील भारतीय राजदूत संधु यांनी या पुरस्काराचा स्विकार केला.
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी आपल्या ट्विटरमध्ये लिहिलंय की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लीजन ऑफ मेरीट पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे. मोदींनी भारत देशाची जागतिक स्तरावर वेगळीच प्रतिमा तयार केलीय. तसेच, अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांतील संबंध मैत्रीपूर्ण आणि सलोख्याचे करण्यात मोदींच्या नेतृत्वाचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच, यंदा हा पुरस्कार नरेंद्र मोदींना देण्यात येत असल्याचंही रॉबर्ट यांनी म्हटलंय.
“President @realDonaldTrump awarded the Legion of Merit to Japanese Prime Minister Shinzo Abe for his leadership and vision for a free and open Indo-Pacific. Ambassador Sugiyama @JapanEmbDC accepted the medal on behalf of Prime Minister Abe.” – NSA Robert C. O’Brien pic.twitter.com/HnjYS14m3L
— NSC (@WHNSC) December 21, 2020
लीजन ऑफ मेरीट अवॉर्डची सुरुवात 1942 साली करण्यात आली असून तेव्हापासून दरवर्षी हा प्रतिष्ठीत अवॉर्ड देण्यात येतो. देशासाठी काहीतरी महत्त्वपूर्ण करणाऱ्या व्यक्तींसह दुसऱ्या देशातील राजकीय पुढाऱ्यांनाही अमेरिकन सैन्य दलातील अधिकाऱ्यांकडून देण्यात येतो. दरम्यान, यापूर्वीही पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशिया, युएई, सऊदी अरब, फिलीस्तीन, मालदीवसर अनेक देशांनी पंतप्रधान मोदींचा देशातील मानाच्या पुरस्काराने सन्मान केला आहे.