"PM मोदींचं स्वागत करा, पण...", अमेरिकेच्या ७५ खासदारांचे बायडेन यांना 'खरमरीत' पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 12:44 PM2023-06-21T12:44:12+5:302023-06-21T12:45:00+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून या दौऱ्याला बुधवारपासून सुरूवात झाली आहे.

 Prime Minister Narendra Modi is on a visit to the US and 75 MPs have written letter to Joe Biden demanding a discussion on India's pressing issues  | "PM मोदींचं स्वागत करा, पण...", अमेरिकेच्या ७५ खासदारांचे बायडेन यांना 'खरमरीत' पत्र

"PM मोदींचं स्वागत करा, पण...", अमेरिकेच्या ७५ खासदारांचे बायडेन यांना 'खरमरीत' पत्र

googlenewsNext

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून या दौऱ्याला बुधवारपासून सुरूवात झाली आहे. मंगळवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) पंतप्रधान अमेरिकेत दाखल झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि त्यांची पत्नी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनी मोदींना खास निमंत्रण पाठवले असून त्यांना आमंत्रित केले आहे. पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेतील आगमनापूर्वी, ७५ अमेरिकन खासदार आणि काँग्रेस प्रतिनिधींनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना पत्र लिहून भारत-अमेरिका यांचे संबंध मजबूत करण्यासाठी काम करा असे म्हटले. याशिवाय अमेरिकन खासदारांनी पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत काही चिंतेच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याची मागणी केली आहे.

मंगळवारी दुपारी लिहिलेल्या पत्रात अमेरिकन स्टेट डिपार्टमेंट आणि सिव्हिल सोसायटीच्या अहवालांचा हवाला देत, खासदारांनी राष्ट्राध्यक्षांना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चेदरम्यान, भारतातील 'राजकीय स्पेस कमी होणे, धार्मिक असहिष्णुता वाढणे, नागरी समाज संघटना आणि पत्रकारांना लक्ष्य करणे, तसेच माध्यमांवर वाढत असलेले प्रतिबंब' या मुद्द्यांना प्राधान्य देण्याची मागणी केली आहे. 

"मित्रांनी मोकळ्यापणाने बोलायला हवे"
भारत सरकारने आपल्या मानवी हक्कांच्या नोंदीवरील टीका सातत्याने फेटाळून लावली आहे. हे अहवाल चुकीच्या माहितीवर आधारित केले असल्याचे भारत सरकारने  वारंवार सांगितले आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात आर्थिक, व्यावसायिक आणि संरक्षण संबंध असल्याचे खासदारांनी त्यांच्या पत्रात नमूद केले. त्यांनी लिहले की, भारत आणि अमेरिका हे मित्र आहेत आणि मित्रांनी प्रामाणिकपणे तथा मोकळेपणाने कोणत्याही मुद्द्यावर बोलले पाहिजे.

"भारत आणि अमेरिका यांच्यात असलेले मैत्रीचे संबंध यामुळेच आम्ही तुम्हाला आदरपूर्वक विनंती करतो की, भारत आणि अमेरिका यांच्यातील समान हिताच्या अनेक मुद्द्यांसह थेट पंतप्रधान मोदींशी चिंतेच्या मुद्द्यांवर देखील चर्चा करायला हवी", असेही अमेरिकन खासदारांनी लिहलेल्या पत्रात नमूद आहे. 

दरम्यान, हे पत्र लिहणाऱ्या खासदारांचे नेतृत्व सीनेटर क्रीस वॅन होलेन आणि प्रमिला जयपाल यांनी केले आहे. होलेन या भारताच्या सध्याच्या राजकीय घडामोडींवर सातत्याने टीका करत असतात. त्यांनी अलीकडेच कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबतच्या डिनरमध्ये सहभाग घेतला होता. 

 

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title:  Prime Minister Narendra Modi is on a visit to the US and 75 MPs have written letter to Joe Biden demanding a discussion on India's pressing issues 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.