Narendra Modi : Video - सिंगापूरमध्ये पंतप्रधान मोदींचा अनोखा अंदाज; गणपती बाप्पा मोरया म्हणत वाजवला ढोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 05:00 PM2024-09-04T17:00:55+5:302024-09-04T17:08:40+5:30

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. आज ते सिंगापूरला पोहोचले, तिथे त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी मोदी गणपती बाप्पा मोरया म्हणत ढोल वाजवताना दिसले.

prime minister Narendra Modi tries his hands on a dhol in singapore | Narendra Modi : Video - सिंगापूरमध्ये पंतप्रधान मोदींचा अनोखा अंदाज; गणपती बाप्पा मोरया म्हणत वाजवला ढोल

Narendra Modi : Video - सिंगापूरमध्ये पंतप्रधान मोदींचा अनोखा अंदाज; गणपती बाप्पा मोरया म्हणत वाजवला ढोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या विदेश दौऱ्यावर आहेत. आज ते सिंगापूरला पोहोचले, तिथे त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. यावेळी मोदी गणपती बाप्पा मोरया म्हणत ढोल वाजवताना दिसले. ब्रुनेईचा दौरा पूर्ण केल्यानंतर भारताचे पंतप्रधान आता सिंगापूरला पोहोचले आहेत. 

आपल्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वोंग आणि राष्ट्रपती थर्मन शानमुगरत्नम यांची भेट घेतील आणि सिंगापूरच्या नेतृत्वाशी संवाद साधतील. मात्र सध्या मोदींचा ढोल वाजवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

सिंगापूरमध्ये लोक त्यांचं जोरदार स्वागत करत आहेत. एका महिलेने पंतप्रधानांना राखीही बांधली आणि अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी केली. पंतप्रधान मोदी ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करत आहेत त्या हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या एका व्यक्तीला त्यांनी ऑटोग्राफही दिला.

पंतप्रधान मोदींचं चांगी विमानतळावर अधिकाऱ्यांनी स्वागत केलं. मोदी नंतर लॉरेन्स वोंग, थर्मन शानमुगरत्नम, वरिष्ठ मंत्री ली सिन लूंग आणि एमेरिटस वरिष्ठ मंत्री गोह चोक टोंग यांची भेट घेतील. त्यांच्या या दौऱ्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. तसेच ढोल वाजवतानाचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. 
 

Web Title: prime minister Narendra Modi tries his hands on a dhol in singapore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.