पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार चीनच्या दौऱ्यावर, शी जिनपिंग यांच्यासोबत शिखर बैठकीत घेणार सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 05:44 PM2018-04-22T17:44:38+5:302018-04-22T17:44:38+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात चीनच्या दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यात मोदी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत शिखर बैठकीत सहभागी होणार आहेत.
बीजिंग - पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात चीनच्या दौऱ्यावर जाणार असून, या दौऱ्यात मोदी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत शिखर बैठकीत सहभागी होणार आहेत. भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यासोबत संयुक्त परिषदेला संबोधित करताना चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी ही माहिती दिली. नरेंद्र मोदी आणि जिनपिंग यांच्यातील अनौपचारिक शिखर बैठक 27 आणि 28 एप्रिलला होणार आहे. गतवर्षी झालेल्या डोकलामच्या तिढ्यानंतर दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये होणारी ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
Prime Minister #NarendraModi will hold a meeting with Chinese President #XiJinping on April 27-28 in Wuhan city, ahead of Shanghai Cooperation Organisation (SCO) summit in June.
— ANI Digital (@ani_digital) April 22, 2018
Read @ANI story | https://t.co/KfUMp2AzLzpic.twitter.com/wc108ZI22j
या परिषदेत संबोधित करताना चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी म्हणाले, "शांघाई सहयोग संघटनेचा (एससीओ) सदस्य बनल्याबद्दल चीनकडून भारताला पुन्हा एकदा शुभेच्छा. तसेच एससीओच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे मी चीनकडून स्वागत करतो."
China has confirmed data sharing on Sutlej and Brahmaputra rivers in 2018. As it directly affects lives of people living there we welcome this. Also Kailash Mansarovar Yatra will resume this year through Nathu La pass: EAM Sushma Swaraj in Beijing pic.twitter.com/Y8SQtL9k5W
— ANI (@ANI) April 22, 2018
तर भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज म्हणाल्या, 2018 मध्ये सतलज आणि ब्रह्मपुत्र या नद्यांचा डेटा भारताला देण्याचे चीनने मान्य केले आहे. चीनने उचललेल्या या पावलाचे भारत स्वागत करतो. तसेच नथू ला येथून होणारी कैलाश मानसरोवर यात्राही यंदापासून पुन्हा सुरू होईल. तसेच दहशतवाद, वातावरणातील बदल, चिरंतन विकास, जागतिक आरोग्य अशा विविध क्षेत्रात सहकार्य करण्यावर दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे. "
We(India-China) agreed to work together on issues like terrorism, climate change, sustainable development, global healthcare etc: EAM Sushma Swaraj in Beijing pic.twitter.com/rrjcVd3riS
— ANI (@ANI) April 22, 2018