भारत-चीन तणावातच रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यंचा पंतप्रधान मोदींना फोन, 'या' विषयावर झाली चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 03:45 PM2020-09-18T15:45:18+5:302020-09-18T15:51:01+5:30

विशेष म्हणजे भारत-चीन तणाव प्रचंड वाढलेला असतानाच दोन्ही देशांच्या नेत्यांत चर्चा झाल्याने, या चर्चेला अधिक महत्व आहे.

Prime minister received a phone call today from  russian president vladimir putin amid tension with china | भारत-चीन तणावातच रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यंचा पंतप्रधान मोदींना फोन, 'या' विषयावर झाली चर्चा

भारत-चीन तणावातच रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यंचा पंतप्रधान मोदींना फोन, 'या' विषयावर झाली चर्चा

Next
ठळक मुद्देवेळी दोन्ही नेत्यांत विशेष आणि विशेषाधिकार असलेली सामरिक भागीदारी अधिक बळकट करण्याबोबररच  अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली.विशेष म्हणजे भारत-चीन तणाव प्रचंड वाढलेला असतानाच दोन्ही देशांच्या नेत्यांत चर्चा झाल्याने, या चर्चेला अधिक महत्व आहे.यावेळी पंतप्रधा मोदी यांनी, दोन्ही देशाचे संबंध बळकट करण्याच्या दृष्टीने वैयक्तीक पुढाकारासाठी पुतीन यांचे कौतुक केले.


नवी दिल्ली - भारत-चीन तणाव सुरू असतानाच रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी शुक्रवारी पंतप्रधान मोदींना  फोन केला. यावेळी दोन्ही नेत्यांत विशेष आणि विशेषाधिकार असलेली सामरिक भागीदारी अधिक बळकट करण्याबोबररच  अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली. या शिवाय कोरोना महामारीच्या काळातही दोन्ही देशांतील संवाद कायम राहिला. यावरही दोन्ही नेत्यांनी आनंद व्यक्त केला. 

विशेष म्हणजे भारत-चीन तणाव प्रचंड वाढलेला असतानाच दोन्ही देशांच्या नेत्यांत चर्चा झाल्याने, या चर्चेला अधिक महत्व आहे. मात्र, या नेत्यांत चीनवर काही चर्चा झाली, की नाही. यासंदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
 
यावेळी पंतप्रधा मोदी यांनी, दोन्ही देशाचे संबंध बळकट करण्याच्या दृष्टीने वैयक्तीक पुढाकारासाठी पुतीन यांचे कौतुक केले. तसेच त्यांना द्विपक्षीय चर्चेसाठी भारतात येण्याचे निमंत्रणही दिले. दोन्ही देश या चर्चेसाठी तारीख निश्चित करतील, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. याशिवाय एससीओ आणि ब्रिक्स संमेल यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल मोदींनी पुतीन यांचे अभिनंदनही केले. 

चीनचे रशियाबरोबरचे संबंधही ठीक नाहीत. रशियाने नुकतेच चीनला हवे असलेले एस-400 सरफेस टु एअर मिसाईल सिस्टिमदेणे टाळले. दक्षीण चीन समुद्रावरील आपल्या दाव्याबरोबरच अनेक महत्वाच्या मुद्द्यांवरून चीनवर टीका होत असतानाच, रशियाने, असा निर्णय घेतल्याने त्याला विशेष महत्व आहे. रशिया आणि चीन यांच्या संबंधात 2014नंतर सुधारणा झाली होती.  मात्र, आता पुन्हा बीजिंग और मॉस्को यांच्यातील संबंध दुरावल्याचे दिसत आहे. रशियाने नुकताच आपल्या एका आर्कटिक रिसर्चरवर विश्वासघाताचा आरोप करत, त्याने अत्यंत महत्वाची माहिती चीनला दिल्याचे म्हटले होते.

चीनच्या तुलनेत भारताला अधिक महत्त्व -
पूर्व लडाखमधील तणाव गेल्या चार महिन्यांपासून कायम असताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतीच रशियाला भेट  दिली. विशेष म्हणजे यावेळी चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंगहीदेखील रशिया दौऱ्यावर होते. मात्र, फेंगही यांच्या तुलनेत सिंह यांना व्यासपीठावर अधिक प्राधान्य मिळाले. सिंह यांचे रशियात झालेले स्वागत पाहता यजमान देशाने चीनच्या तुलनेत भारतासोबतच्या मैत्रीला अधिक महत्त्व दिल्याची चर्चा होती. 

या दौऱ्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह विविध बैठकांना उपस्थित होते. यावेळी वेई फेंगही सगळ्याच ठिकाणी त्यांच्या मागून चालताना दिसत होते. सिंह आणि फेंगही एकाचवेळी सैन्य स्मारकाजवळ पुष्पचक्र वाहण्यासाठी गेले. त्यावेळी रशियाच्या लष्कराचे अधिकारी सिंह यांच्या दोन्ही बाजूंना उपस्थित होते. मात्र फेंगही यांना तेवढे महत्त्व दिले गेले नव्हते.

महत्त्वाच्या बातम्या -

"झोपेत घोरत असाल तर सावधान! कोरोनामुळे मृत्यूचा तिप्पट धोका"

PAK-चीनच्या संपत्तीतून 1 लाख कोटी कमावण्याच्या तयारीत मोदी सरकार, लवकरच आणणार कायदा!

अमेरिकेला फक्त 4 आठवड्यांत मिळणार कोरोना लस, ट्रम्प यांचा मोठा दावा...!

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

कोरोनामुळे अनेकांच्या 'अंतिम' इच्छेला मूठमाती; अवयवदानाचा/देहदानाचा टक्का घसरला

Web Title: Prime minister received a phone call today from  russian president vladimir putin amid tension with china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.