१७ वर्षीय मुलीसोबत तीन वेळा रेपचा आरोप, राजकुमार देणार १२२ कोटी रूपये

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 05:11 PM2022-02-16T17:11:55+5:302022-02-16T17:12:20+5:30

ब्रिटनच्या महाराणीने या केसमध्ये हस्तक्षेप केला आणि प्रिन्सची आर्थिक मदतही केली. यानंतर व्हर्जीनिया आणि Prince Andrew यांच्यातील रेपचा वाद मिटला.

Prince Andrew Virginia Robert's Giuffre settles sex abuse lawsuit case Britain | १७ वर्षीय मुलीसोबत तीन वेळा रेपचा आरोप, राजकुमार देणार १२२ कोटी रूपये

१७ वर्षीय मुलीसोबत तीन वेळा रेपचा आरोप, राजकुमार देणार १२२ कोटी रूपये

googlenewsNext

'ड्यूक ऑफ यॉर्क' ब्रिटनचा Prince Andrew आणि व्हर्जिनीया रॉबर्ट्स ग्रिफे यांच्यात समेट झाला आहे. Prince Andrew ब्रिटनची महाराणी एलिजाबेथचे द्वितीय पूत्र आहे. महाराणीने या केसमध्ये हस्तक्षेप केला आणि प्रिन्सची आर्थिक मदतही केली. यानंतर व्हर्जीनिया आणि Prince Andrew यांच्यातील रेपचा वाद मिटला.

ब्रिटिश मीडियाच्या रिपोर्टनुसार, हा रेपचा वाद १२२ कोटी रूपयांमध्ये सेटल करण्यात आला. 'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, या प्रकरणात महाराणीने हस्तक्षेप केला. त्यांनी याप्रकरणी पैसे देण्यात प्रिन्सची आर्थिक मदत केली. एकूणच हा सगळा पैसा महाराणी देणार आहे. टेलीग्राफच्या रिपोर्टमध्ये तसा उल्लेख करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

'डेली मेल'नुसार, Prince Andrew आणि जेप्री एपस्टेन यांची १९९९ मध्ये भेट झाली होती. जेफ्रीने त्याची भेट घिसलाइन मॅक्सवेलसोबत करून दिली होती. मॅक्सवेल न्यूजपेपर टायकून रॉबर्ट मॅक्सवेलची मुलगी होती. त्यानंतर प्रिन्सने तिला एका घरगुती इव्हेंटमध्ये बोलवलं होतं. २००१ मध्ये व्हर्जीनिया रॉबर्ट्स ग्रिफेने दावा केला होता की, Prince Andrew ने माझ्यासोबत तीन वेळ संबंध ठेवले.

हे सगळं मॅक्सवेलच्या लंडनमधील टाऊनहाऊसमध्ये १० मार्चला झालं होतं. तेव्हा दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. तिने बीबीसीच्या मुलाखतीत या भेटीबाबत नकार दिला होता. २००८ मध्ये एपस्टेनला मुलांच्या लैंगिक तस्करीबाबत १८ वर्षांची शिक्षा झाली. मग २०१० मध्ये तो सुटला. त्यानंतर न्यूयॉर्क सेंट्रल पार्कमध्ये तो प्रिन्ससोबत दिसला. २०११ मध्ये जेव्हा दोघांचा फोटो झाला तेव्हा प्रिन्सने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. एपेस्टनवर अनेक मुलींच्या तस्करीचा आरोप आहे. व्हर्जीनिया ग्रिफे रॉबर्ट्स त्याच मुलींपैकी एक आहे. ज्यांची तस्करी झाली होती. आता तिचं वय ३८ वर्षे आहे.

२०१५ मध्ये महिलेने लावला आरोप

२०१५ मध्ये एपेस्टनशी संबंधित कागदपत्र अमेरिकेच्या कोर्टात सादर करण्यात आले. या रिपोर्टमध्ये व्हर्जीनिया रॉबर्ट्स ग्रिफेचं नावही होतं. तिने फ्लोरिडात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये सांगितलं होतं की, जेव्हा ती १७ वर्षांची होती तेव्हा Prince Andrew ने तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. ऑगस्ट २०२१ मध्ये एक केस प्रिन्स विरोधात दाखल करण्यात आली होती.
 

Web Title: Prince Andrew Virginia Robert's Giuffre settles sex abuse lawsuit case Britain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.