इंग्लंडचे 95 वर्षांचे राजकुमार प्रिन्स फिलिप : त्यांच्याबद्दल माहितीच असाव्यात अशा 10 गोष्टी

By admin | Published: May 5, 2017 03:17 PM2017-05-05T15:17:16+5:302017-05-05T15:25:49+5:30

ब्रिटनचे राजकुमार, ड्यूक आॅफ एडिन्बर्ग प्रिन्स फिलिप यांनी शाही जबाबदारीतून निवृत्तीची घोषणा केली आणि जगभरात या ९५ वर्षाच्या मिष्किल,हसऱ्या आणि सदाबहार गृहस्थाविषयी चर्चा सुरु झाली.

Prince Philip, 95, of England: There are 10 things that should be known about him | इंग्लंडचे 95 वर्षांचे राजकुमार प्रिन्स फिलिप : त्यांच्याबद्दल माहितीच असाव्यात अशा 10 गोष्टी

इंग्लंडचे 95 वर्षांचे राजकुमार प्रिन्स फिलिप : त्यांच्याबद्दल माहितीच असाव्यात अशा 10 गोष्टी

Next

ऑनलाइन लोकमत

ब्रिटनचे राजकुमार, ड्यूक आॅफ एडिन्बर्ग प्रिन्स फिलिप यांनी शाही जबाबदारीतून निवृत्तीची घोषणा केली. मागच्या पिढीतल्या लोकांना प्रिन्स फिलिप राणी एलिझाबेथ यांचे पती म्हणून परिचित असले तरी आजच्या तरुण पिढीला मात्र त्यांचे पहिल्यांदा अप्रूप वाटले होते ते त्यांनी ओबामा पतीपत्नींना स्वत: राजप्रासादात ड्राईव्ह करत होते तेव्हा. सारे राजशिष्टाचार बाजूला ठेवून अत्यंत प्रेमानं आणि कौटुंबिक वडिलधारेपणाच्या नात्यातनं त्यांनी केलेल्या या कृतीचं जगभरात कौतूक झालं होतंच. नेहमीच त्यांच्या संयत वागण्याबोलण्याचं कौतूक झालं. अनेकदा ९० च्या दशकात त्यांनी केलेल्या वक्तव्यांनी ते अडचणीतही आले. मात्र तरीही ते करत असलेलं काम, त्यांची काम करतानाची समर्पण वृत्ती आणि बोलण्यातला मिष्किलपणा  यानं ते जगभरात प्रसिद्ध झाले. राणी एलिझाबेथ आपल्या व्यक्तिगत आयुष्याविषयी फारसं कधी बोलत नाहीत.

(शाही जबाबदारीतून फिलिप यांची निवृत्ती)
 

मात्र प्रिन्स फिलिप यांच्याबद्दल त्यांनी लग्नाच्या ५०व्या वाढदिवशी ( १९९७) जे मनापासून सांगितलं ते अत्यंत वेगळं होतं. त्या अत्यंत मनापासून, निखळपणे आणि तितक्याच साधेपणानं म्हणाल्या होत्या की, ‘गेली अनेक वर्षे ते माझी ताकद बनून राहिलेत, शांतपणे माझ्यासोबत चालत राहिले!’ प्रिन्स फिलिप यांच्या व्यक्तिमत्वातला हा साधेपणा राजशिष्टाचारातच नाही तर आजच्या कार्पोरेट जगातही मिसाल म्हणून पहायला हवा. ते कधी फारसे नियम, शिष्टाचार, संकेत यांना महत्व देत नसतं. आपल्या ९० व्या वाढदिवशी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी किती सहज सांगितलं होतं की, ‘ मी जर कुणाला विचारलं की तुमच्या माझ्याकडून काय अपेक्षा आहेत? तर लोक इकडे तिकडे पाहतात. त्यांच्या नजरा कोऱ्या होतात. ते काहीच बोलत नाहीत, कुणाला काही सांगावंसं वाटत नाही, असं का? जरा बोला की मनमोकळेपणानं, भीड बाजूला ठेवून..’ काळ आणि संकेत यांची बंधनं न पाळणारी अशी माणसं म्हणूनच जगभरात वेगळी दिसतात. त्यांचं अप्रूप वाटतं. म्हणून त्यांची अधिक माहिती हाताशी हवी.. प्रिन्स फिलिप्स यांच्याविषयी माहितीच असाव्यात अशा या १० गोष्टी..

१) राजकुमार म्हणून आयुष्य जगलेल्या या माणसाचा जन्म झाला तो ग्रीसमध्ये, तो ही एका डायनिंग टेबलावर. त्या काळात हे राजघराणं देशनिकालीच्या अस्वस्थ काळातून जात होतं.

२) ते १८ महिन्याचे होते, त्या काळात या कुटुंबाला ग्रीस सोडूनही बाहेर पडावं लागलं. रॉयल नेव्ही शिपनं , एका जेमतेम होडीतून छोट्याशा लाकडी पेटीतून त्यांनी हा प्रवास केला.

३) वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी त्यांची आणि राणीची भेट झाली. राणी एलिझाबेथ त्या काळी आठ वर्षाच्या होत्या. एका लग्नता ते भेटले होते.

 

७) राजघराण्यातले हे पहिले सदस्य ज्यांनी पहिला टीव्ही इण्टरव्ह्यू केला. ( १९६१). कॉमनवेल्थ संदर्भात त्यांची ही मुलाखत घेण्यात आली होती.

८) क्रिकेट हा त्यांचा अत्यंत आवडता खेळ. लॉडर्स अत्यंत आवडतं मैदान.

९) आता निवृत्तीनंतर ते काय करतात, कुठलं नवीन काम हाती घेतात याकडे जगाचं लक्ष आहे कारण त्यांना अनेक गोष्टीत गती आहेच, पण अनेक संस्थांसाठी ते काम करतात.

१०)इंग्लंडची राणीबद्दल, राजघराण्याबद्दल जगभर अप्रूपाची, कुतूहलाची आणि औत्सुक्याची भावना असली तरी प्रिन्स फिलिप्स यांच्याविषयी मात्र आदर अधिक दिसतो. त्याला कारण त्यांचा साधेपणा.

Web Title: Prince Philip, 95, of England: There are 10 things that should be known about him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.