लग्नाआधी सेक्स केल्याने तुरूंगवास
By admin | Published: March 9, 2017 05:11 PM2017-03-09T17:11:22+5:302017-03-09T17:11:22+5:30
लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे दोघांना अटक करण्यात आल्याची घटना
Next
>ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 9 - लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवल्यामुळे संयुक्त अरब अमीरातमध्ये ( UAE) दोघांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला इसम दक्षिण आफ्रिकेतील तर त्याची भावी पत्नी युक्रेनचे रहिवासी आहेत. एमलिन कल्वरवेल (29) आणि इरिना नोहाइ (27) असं अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत.
पोटात दुखत असल्यामुळे उपचारासाठी इरिना डॉक्टरकडे गेली असता ती गर्भवती असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्यानंतर डॉक्टरांनी याबाबत तेथील अधिका-यांना माहिती दिली आणि दोघांना अटक करण्यात आली. संयुक्त अरब अमीरातमध्ये लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणं बेकायदेशीर मानलं जातं.
हे यूएईतील अंतर्गत प्रकरण आहे, आम्ही त्यांची मदत करू शकत नाही. त्या दोघांनी कायदेशीर मदत घ्यावी, असं दक्षिण आफ्रिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. एमलिन आणि इरिना यांना जानेवारी महिन्यातच 29 तारखेला त्यांना अटक करण्यात आली होती, अशी माहिती आता समोर येत आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या वेबसाइटने हे वृत्त दिल्यानंतर या घटनेवर प्रकाश पडला.