भारतीय वंशाच्या डॉक्टरला तुरुंगवास
By Admin | Published: April 20, 2016 03:02 AM2016-04-20T03:02:36+5:302016-04-20T03:02:36+5:30
आर्थिक फसवणूक प्रकरणात भारतीय वंशाच्या एका डॉक्टरला अमेरिकेत ९ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे
ह्यूस्टन : आर्थिक फसवणूक प्रकरणात भारतीय वंशाच्या एका डॉक्टरला अमेरिकेत ९ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. परमजितसिंह अजरावत या डॉक्टरला भरपाई म्हणून ३० लाख डॉलर भरण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
परमजित आणि त्यांची पत्नी सुखवीन कौर अरजावत हे पेन मॅनजमेंट सेंटर चालवतात. सप्टेंबर २०१५ मध्ये या दोघांना दोषी ठरविण्यात आले होते, तर परमजित यांच्या पत्नीचे फेब्रुवारीत निधन झाले. ३० लाख डॉलरच्या हेल्थकेअर योजनेत फसवणूक केल्याप्रकरणी हे दोघे दोषी ठरले आहेत. (वृत्तसंस्था)