ताजिकिस्तानमधल्या तुरुंगात सुरक्षारक्षक अन् कैदी आपसात भिडले, 32 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 03:46 PM2019-05-20T15:46:38+5:302019-05-20T15:46:50+5:30

ताजिकिस्तानमधल्या तुरुंगात दंगल भडकल्यानं 32 जणांचा मृत्यू झाला आहे.

Prisoners and prisoners in prison detained in Tajikistan, 32 people die | ताजिकिस्तानमधल्या तुरुंगात सुरक्षारक्षक अन् कैदी आपसात भिडले, 32 जणांचा मृत्यू

ताजिकिस्तानमधल्या तुरुंगात सुरक्षारक्षक अन् कैदी आपसात भिडले, 32 जणांचा मृत्यू

Next

दुशान्बे- ताजिकिस्तानमधल्या तुरुंगात दंगल भडकल्यानं 32 जणांचा मृत्यू झाला आहे. या वृत्ताची माहिती एएफपीनं दिली आहे. मृतांमध्ये तीन गार्ड आणि इतर कैद्यांचा समावेश आहे. या दंगलीची सुरुवात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी केली आहे. या तुरुंगाला सुरक्षेच्या दृष्टीनं अतिसुरक्षित मानलं जातं.

सेनेच्या मते, ही हाणामारी रविवारी रात्री बख्दतमधल्या तुरुंगात झाली आहे. जी राजधानी दुशान्बेपासून 10 किलोमीटर पूर्वेला आहे. दहशतवाद्यांजवळ चाकूही सापडला आहे. ज्यात तीन गार्ड आणि पाच कैद्यांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 150 कैद्यांच्या या तुरुंगात सुरक्षा दलानं 24 कैद्यांचा खात्मा केला आहे. इस्लामिक स्टेटचं एका वेळी सीरिया आणि इराकवर नियंत्रण होतं. या संघटनेनं गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ताजिकमधल्या जेलमध्ये झालेल्या दंगलीची जबाबदारीही स्वीकारली होती. 

Web Title: Prisoners and prisoners in prison detained in Tajikistan, 32 people die

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग