'फेसबुक'चा पुन्हा गोंधळ ! 14 मिलियन युजर्सचा खासगी डेटा झाला सार्वजनिक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 07:44 AM2018-06-08T07:44:18+5:302018-06-08T11:57:54+5:30
जगभरात लोकप्रिय असलेली सोशल नेटवर्कींग साईट फेसबुकवरील युजर्सची खासगी माहिती केंब्रिज अॅनालिटिका कंपनीनं चोरल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक नवीन गंभीर प्रकार समोर आला आहे.
न्यू-यॉर्क - जगभरात लोकप्रिय असलेली सोशल नेटवर्कींग साईट फेसबुकवरील युजर्सची खासगी माहिती केंब्रिज अॅनालिटिका कंपनीनं चोरल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक नवीन गंभीर प्रकार समोर आला आहे. फेसबुकच्या सॉफ्टवेअरमध्ये गोंधळ झाला होता, यामुळे 14 मिलियन युजर्सचा खासगी डेटा सार्वजनिक झाला. याबाबत फेसबुकनं गुरुवारी (7 जून) माफीदेखील मागितली आहे. 18 मे ते 27 मे या कालावधीदरम्यान हा गोंधळ झाल्याची माहिती समोर आली आहे.
Facebook bug made some private posts public, affecting as many as 14 million users, reports AP. pic.twitter.com/qy0nHfdp52
— ANI (@ANI) June 7, 2018
फेसबुक सॉफ्टवेअरमध्ये बग असल्याचं म्हटलं जात आहे. हा बगमुळे स्वतःहूनच युजर्सकडून करण्यात आलेले नवीन पोस्ट्स सार्वजनिक होते. सेंटिग पर्यायमध्ये जाऊन सार्वजनिक पोस्ट खासगी करण्यासाठी युजर्संनी कितीही प्रयत्न केले तरी यामध्ये बदल होत नसल्याचे निदर्शनास आले. यापूर्वी ट्विटरनंही आपल्या सॉफ्टवेअरमध्ये अडचणी निर्माण झाल्याचे माहिती युजर्संना दिली होती. शिवाय, डेटा चोरी होऊ नये यासाठी आपल्या युजर्संना पासवर्ड बदलण्यासही सांगितले होते. काही दिवसांपूर्वी राजकीय डाटा विश्लेषक कंपनी कॅम्ब्रिज अॅनालिटिकाने कोणतीही परवानगी न घेता फेसबुकवरील 5 कोटी युजर्सचा डेटा चोरल्याचे प्रकरण समोर आले.