प्रियंका चतुर्वेदींची सूचना, एलन मस्क यांचा होकार आणि पाकिस्तानचा झाला सॉलिड गेम, प्रकरण काय?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 20:32 IST2025-02-27T20:26:02+5:302025-02-27T20:32:47+5:30

Pakistan News: इंग्लंडमध्ये उघडकीस आलेलं ग्रुमिंग गँग प्रकरण, त्यात मस्क यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि त्यांना  ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेली एक सूचना यामुळे इंटरनेटसाठी मस्क यांच्याकडे आशाळभूतपणे पाहत असलेल्या पाकिस्तानचा गेम झाला आहे. 

Priyanka Chaturvedi's suggestion, Elon Musk's nod and Pakistan's solid game, what's the matter? | प्रियंका चतुर्वेदींची सूचना, एलन मस्क यांचा होकार आणि पाकिस्तानचा झाला सॉलिड गेम, प्रकरण काय?  

प्रियंका चतुर्वेदींची सूचना, एलन मस्क यांचा होकार आणि पाकिस्तानचा झाला सॉलिड गेम, प्रकरण काय?  

आर्थिक बाबतीत संकटात सापडलेला पाकिस्तान तंत्रज्ञानाच्या दृष्टीने बराच पिछाडीवर पडलेला आहे. सध्या पाकिस्तान इतर गोष्टींसोबतच कमी इंटरनेटच्या स्पीडमुळेही त्रस्त आहे. दरम्यान, जानेवारीमध्ये पाकिस्तानात इंटरनेटचा स्पीड कमी होऊ लागल्यावर पाकिस्तानी लोकांनी एकन मस्कला एक्सवर टॅग करून स्टारलिंककडे सेवा मागितली. मस्क यांनीही स्टारलिंकला पाकिस्तान सरकारकडून परवानगीची प्रतीक्षा असल्याचे सांगितले.  मात्र त्याच दरम्यान, इंग्लंडमध्ये उघडकीस आलेलं ग्रुमिंग गँग प्रकरण, त्यात मस्क यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि त्यांना  ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केलेली एक सूचना यामुळे इंटरनेटसाठी मस्क यांच्याकडे आशाळभूतपणे पाहत असलेल्या पाकिस्तानचा गेम झाला आहे. 

त्याचं झालं असं की, जानेवारीमध्ये पाकिस्तानात इंटरनेटचा स्पीड कमी होऊ लागला होता.  त्यावेळी काही पाकिस्तानी लोकांनी एकन मस्कला एक्सवर टॅग करून स्टारलिंककडे सेवा मागितली. तेव्हा मस्क यांनी स्टारलिंकला पाकिस्तान सरकारकडून परवानगीची प्रतीक्षा असल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळी इंग्लंडमध्ये उघडकीस आलेल्या ग्रुमिंग गँग प्रकरणात पाकिस्तानी वंशाच्या लोकांचा हात असल्याचं समोर आलं. तेव्हा एलन मस्क यांनी आक्रमक भूमिका घेतली.  तसेच एलन मस्क यांनी इंग्लंडमधील ग्रुमिंग गँग प्रकरणात आक्रमक भूमिका घेत इंग्लंडचे पंतप्रधान केर स्टार्मर यांना हटवण्यापर्यंतची विधानं केली होती. दीड दशकापूर्वी घडलेल्या या घटनेवेळ काही पाकिस्तानी वंशाच्या लोकांना इंग्लंडमधील मुलींना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर अत्याचार केले होते. तेव्हा स्टार्मर हे सरकारी वकील होते. मात्र ते दोषींना शिक्षा देण्यास अपयशी ठरले होते. त्यामुळे आता त्यांना त्याची शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मागणी मस्क यांनी केली होती.

त्यावेळी, एलन मस्क या प्रकरणाचा एशियन ग्रुमिंग गँग असा उल्लेख सातत्याने करत होते. मात्र शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी या गँगला एशियन नव्हे तर पाकिस्तानी म्हणा, असा सल्ला एलन मस्क यांना दिला होता. त्यावर एलन मस्क यांनी होकार दिला होता. त्यानंतर पाकिस्तान आणि मस्क यांच्यातील संबंध बिघडले. एलन मस्क यांनी प्रियंका चतुर्वेदी यांच्या सूचनेशी सहमती दर्शवल्यानंतर पाकिस्तानमधील खासदार नाराज झाले. तसेच स्टारलिंकला परवाना देण्यापूर्वी मस्क यांना पाकिस्तानची माफी मागायला लावली पाहिजे, अशी मागणी केली. पाकिस्तानमधील पीएमएल-एनचे खासदार आणि माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचारासंदर्भातील समितीचे सदस्य अहमद अत्तीक अन्वर यांनी पाकिस्तानने या प्रकरणात एलन मस्क यांच्यासोबतच डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेही दुर्लक्ष केलं पाहिजे असा सल्ला दिलाय. मात्र  या सर्वांमध्ये पाकिस्तानमध्ये सुरू होणारी स्टारलिंकची सेवा अधांतरी लटकली आहे. 

Web Title: Priyanka Chaturvedi's suggestion, Elon Musk's nod and Pakistan's solid game, what's the matter?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.