प्रोफेसर विद्यार्थ्यांसोबत शरीरसंबंध ठेऊ शकत नाही - हार्वर्ड विद्यापीठाचा फतवा
By admin | Published: February 6, 2015 01:49 PM2015-02-06T13:49:24+5:302015-02-06T13:49:34+5:30
विद्यापीठातील प्रोफेसर आणि विद्यार्थ्यांमधील पवित्र नाते कायम राहावे यासाठी केंब्रिजमधील ख्यातनाम हार्वर्ड विद्यापीठाने नवी नियमावलीच जाहीर केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
केंब्रिज, दि.६ - विद्यापीठातील प्रोफेसर आणि विद्यार्थ्यांमधील पवित्र नाते कायम राहावे यासाठी केंब्रिजमधील ख्यातनाम हार्वर्ड विद्यापीठाने नवी नियमावलीच जाहीर केली आहे. विद्यापीठातील प्रोफेसर विद्यार्थ्यांसोबत शरीरसंबंध ठेऊ शकत नाही असा फतवा विद्यापीठ प्रशासनाने गुरुवारी काढला आहे.
केंब्रिजमधील ख्यातनाम हार्वर्ड विद्यापीठात विविध विभागांमध्ये सध्या २,४०० प्रोफेसर असून ६,७०० विद्यार्थी विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. विद्यापीठाच्या आर्ट्स अँड सायन्स समितीने सेक्शुअल मिसकंडक्ट पॉलिसीमध्ये काही महत्त्वपूर्ण बदल केले आहे. यामध्ये प्रोफेसर विद्यार्थ्यांसोबत सेक्स करु शकत नाही असे नवे परीपत्रकच समितीने जारी केले आहे. आम्ही विद्यापीठातील प्रोफेसर, विद्यार्थ्यांकडून गेल्या काही महिन्यांमध्ये यासंबंधी मतं मागवली होती. या आधारे आम्ही हा नवा नियम लागू केल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले. प्रोफेसर आणि विद्यार्थी यांच्यातील संबंध हे फक्त शिक्षणापुरतेच मर्यादीत असायला हवे हा आमचा केंद्रबिंदू असून हा नवीन नियमही यासाठीच लागू केल्याचे सदस्यांनी स्पष्ट केले.