विद्यापीठाच्या कार्यक्रमात महिलेने कार घुसविली
By admin | Published: October 25, 2015 11:43 PM2015-10-25T23:43:20+5:302015-10-25T23:43:20+5:30
येथील एका विद्यापीठाच्या कार्यक्रमात मद्यपी महिलेने कार घुसविल्याने झालेल्या अपघातात एका भारतीय विद्यार्थिनीसह चार जण ठार झाले, तर ४० जण जखमी झाले आहेत.
न्यूयॉर्क : येथील एका विद्यापीठाच्या कार्यक्रमात मद्यपी महिलेने कार घुसविल्याने झालेल्या अपघातात एका भारतीय विद्यार्थिनीसह चार जण ठार झाले, तर ४० जण जखमी झाले आहेत.
युनिव्हर्सिटी आॅफ सेंट्रल ओकलाहोमाचे अध्यक्ष डोन बेत्ज यांनी सांगितले की, शनिवारी झालेल्या या दुर्घटनेत एमबीएची विद्यार्थिनी मुंबई निवासी निकिता नाकल ही मृत्युमुखी पडली आहे. एडॅसिया आवेरी ही २५ वर्षीय महिला भरधाव कार चालवीत होती. तिने मद्य प्राशन केले होते. विद्यापीठाच्या परिसरात सुरू असलेल्या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमातच या महिलेने कार घुसविली. या दुर्घटनेत तीन वयस्क नागरिकांचा जागीच मृत्यू झाला.
एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार या कार्यक्रमासाठी १०० जण उपस्थित होते. यावेळी कार ताशी ५० कि.मी.च्या वेगाने धावत होती. स्टीलवॉटर सिटी काऊन्सिलच्या महापौर गिना नोबल यांनी सांगितले की, या दुर्घटनेमुळे आम्ही अत्यंत दु:खी आहोत. आम्ही पीडित परिवाराच्या सोबत आहोत. पोलिसांनी सांगितले की, या दुर्घटनेतील आठ जणांची प्रकृती गंभीर आहे, तर १७ जणांना किरकोळ मार लागला आहे. जखमींमध्ये मुलांचाही समावेश आहे.