पाकिस्तानमध्ये आणखी एक शस्त्रू ठार! CRPF ताफ्यावरील हल्ल्यातील मास्टरमाईंडची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 11:40 AM2023-12-06T11:40:44+5:302023-12-06T11:42:15+5:30
२०१६ मध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यातील मास्टरमाईंडची पाकिस्तानमध्ये हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.
२०१६ मध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यातील मास्टरमाईंडची पाकिस्तानमध्ये हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. ही हत्या अज्ञात हल्लेखोरांनी केली. लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख दहशतवादी अदनान अहमद उर्फ हंजला अदनान याची कराचीमध्ये हत्या केली. २०१६ मध्ये पंपोरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा हंजाला मास्टरमाईंड होता. या हल्ल्यात ८ जवान शहीद झाले, तर २२ जवान जखमी झाले होते.
"पप्पा लवकरच मरणार", उपचारासाठी फिरत होता लेक; सोनू सूद झाला 'देवदूत', म्हणाला...
हंजलाने २०१५ मध्ये जम्मूच्या उधमपूरमध्ये बीएसएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात बीएसएफचे २ जवान शहीद झाले तर १३ बीएसएफ जवान जखमी झाले. या हल्ल्याचा तपास NIA ने केला आणि ६ ऑगस्ट २०१५ रोजी आरोपपत्र दाखल केले. या दोन्ही हल्ल्यांमध्ये हंजला पाकिस्तानात बसून दहशतवाद्यांना सूचना देत होता. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आणि पुलवामा भागात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात हंजलाचा मोठा हात होता.
हंजलाला पीओकेमधील लष्कर कॅम्पमध्ये नव्याने भरती झालेल्या दहशतवाद्यांची दिशाभूल करण्यासाठी पाठवण्यात आले होते, जे दहशतवादी भारतात घुसून दहशतवादी हल्ले करण्याच्या तयारीत होते. अदनानला लष्कर कम्युनिकेशन एक्स्पर्ट असेही म्हटले जाते.
हंजलाचा मृत्यू हा लष्कर प्रमुख हाफिज सईदसाठी मोठा धक्का मानला जात आहे. अदनान अहमद उर्फ हंजला अदनान हा लष्कर प्रमुख हाफिजच्या जवळचा होता. २-३ डिसेंबरच्या रात्री अज्ञात हल्लेखोरांनी ४ गोळ्या झाडून हे हत्याकांड घडवून आणले. कडेकोट बंदोबस्तात अदनानची हत्या करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अदनान अहमदला त्याच्या सुरक्षित घराबाहेर गोळ्या घालण्यात आल्या, गोळी झाडल्यानंतर त्याला पाकिस्तानी लष्कराने गुप्तपणे कराची येथील रुग्णालयात दाखल केले. ५ डिसेंबर रोजी त्याचे निधन झाले. हाफिजसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. हंजलाने अलीकडेच रावळपिंडीहून कराचीला आपला ऑपरेशन तळ हलवला होता.