भारताला ‘नाटो’ देशांसारखा दर्जा देण्याचा प्रस्ताव
By admin | Published: March 24, 2016 12:46 AM2016-03-24T00:46:29+5:302016-03-24T00:46:29+5:30
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित बाबींची निर्यात व निर्यात होणाऱ्या संरक्षण सामग्रीच्या दर्जा वाढविण्यासाठी भारताला ‘नाटो’ देशांसारखा दर्जा देणारा
Next
वॉशिंग्टन : माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित बाबींची निर्यात व निर्यात होणाऱ्या संरक्षण सामग्रीच्या दर्जा वाढविण्यासाठी भारताला ‘नाटो’ देशांसारखा दर्जा देणारा प्रस्ताव येथील काँग्रेसमध्ये सादर करण्यात आला आहे.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री अॅश्टन कार्टर लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यापूर्वीच हा प्रस्ताव सादर करून अमेरिका भारताशी सहकार्य वाढवू इच्छितो, असा संदेश यातून देण्यात आला आहे.