ट्रम्प यांच्या मुस्लीम बंदी आदेशाविरुद्ध निदर्शने
By admin | Published: January 30, 2017 01:01 AM2017-01-30T01:01:09+5:302017-01-30T01:01:09+5:30
सात मुस्लीम देशांतून स्थलांतर करणाऱ्यांवर अमेरिकेतील प्रवेशावर घालण्यात आलेल्या बंदीच्या निषेधार्थ अमेरिकेतील विमानतळांवर हजारो लोकांनी निदर्शने केली.
ट्रम्पच्या निषेधार्थ जोरदार घोषणा
न्यूयॉर्क : सात मुस्लीम देशांतून स्थलांतर करणाऱ्यांवर अमेरिकेतील प्रवेशावर घालण्यात आलेल्या बंदीच्या निषेधार्थ अमेरिकेतील विमानतळांवर हजारो लोकांनी निदर्शने केली.
एवढेच काय ज्यांच्याकडे ग्रीन कार्ड आहे त्यांनादेखील अमेरिकेत प्रवेश करण्यापासून रोखून धरण्यात आले, असे वृत्त पसरताच विमानतळांवर लोक एकत्र होण्यास प्रारंभ झाला. ट्रम्प यांच्या निर्णयाचा निषेध करणारे फलक त्यांच्या हाती होते. १२० दिवसांसाठी सगळ््या निर्वासितांच्या तर सात मुस्लीम देशांतील नागरिकांवर ९० दिवस अमेरिकेत प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. येथील अत्यंत वर्दळीच्या जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर लोक अनेक तास ट्रम्प यांच्या निषेधाच्या घोषणा देत होते. ज्यांच्याकडे ग्रीन कार्ड आणि कायदेशीर व्हिसा आहे व जे कामांसाठी किंवा वैयक्तिक भेटीवर आले आहेत त्यांच्यावर या निर्णयाचा मोठा परिणाम होणार आहे.
अशाच गोंधळाचे दृश्य लॉस एंजिलिस, ह्यूस्टन व बोस्टन विमानतळांवर होते.
कोर्टाने दिली स्थगिती
निर्वासितांना आणि ज्या व्हिसाधारकांना स्थानबद्ध करण्यात आले आहे त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त आदेशाच्या अमलबजावणीला अमेरिकेच्या जिल्हा न्यायालयाने रविवारी तात्पुरती स्थगिती दिली. अमेरिकन सिव्हील लिबरटीज युनियनने दोन इराकींच्या वतीने न्यूयॉर्कमध्ये दाखल केलेल्या याचिकेवर जिल्हा न्यायाधीश अॅन्न डोनेल्ली यांनी तातडीचा आदेश दिला.
ग्रीनकार्डधारक पाच लाख
गेल्या दहा वर्षांत किती लोकांना ग्रीनकार्ड मिळाले याची नेमकी आकडेवारी उपलब्ध नसली तरी अमेरिकेत पाच लाख लोक कायदेशीररित्या वास्तव्यास आहेत, असा प्रोपब्लिकाने अंदाज व्यक्त केला आहे. हे लोक देशाबाहेर असतील तर त्यांच्यावर पुन्हा प्रवेशासाठी बंदी घातली जाऊ शकते किंवा त्यांच्यावरही बंदी येऊ शकते. पाच वर्षांनंतर ग्रीनकार्डधारक अमेरिकन नागरिकत्वासाठी अर्ज करू शकतात परंतु बहुतांश जण तसे लगेचच करीत नाहीत.
इराणचे प्रत्त्युत्तर : अमेरिकेने मुस्लीम बहुसंख्य असलेल्या सात देशांतून अमेरिकेत येणाऱ्यांवर घातलेली बंदी ही अतिरेक्यांना मोठी भेटच दिली गेली आहे, असे इराणचे परराष्ट्र मंत्री मोहम्मद जावद झरीफ यांनी म्हटले. मुस्लिमांवरील बंदीची नोंद इतिहासात अतिरेक्यांना व त्यांच्या पाठिराख्यांना मोठी भेट अशी होईल, असे ते टिष्ट्वटरवर म्हणाले. सामुदायिक भेदभावामुळे दहशतवाद्यांच्या भरतीला मदतच होणार असल्याचे ते म्हणाले.
निर्णय अन्यायकारक
बर्लिन : ट्रम्प यांच्या निर्णयाचा जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल यांनी रविवारी निषेध केला. निर्बंध हे अन्यायकारक असल्याचे मर्केल यांनी म्हटल्याचे त्यांच्या प्रवक्त्याने म्हटले. अमेरिकन सरकारने निर्वासितांनी आणि काही विशिष्ट देशांवर अमेरिकेत प्रवेश करण्यावर घातलेले निर्बंध हे खेदजनक असल्याचे त्या म्हणाल्या.
कॅनडाचे द्वार खुले
सगळ््या निर्वासितांना कॅनडा स्वीकारील, असे आश्वासन पंतप्रधान जस्टीन त्रुदेऊ यांनी शनिवारी दिले. ट्रम्प यांनी निर्वासितांच्या अमेरिका प्रवेशावर घातलेल्या बंदीवर त्रुदेऊ यांनी टिष्ट्वटरवर दिलेल्या प्रतिक्रियेते म्हटले आहे की, ‘‘जे छळामुळे, युद्धामुळे व दहशतीमुळे निघून जात आहेत त्यांचे कॅनडाचे लोक स्वागत करतील.