गाझावरील हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या लोकांची पंतप्रधान नेतन्याहू यांच्या घराबाहेर निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 02:05 PM2023-11-05T14:05:41+5:302023-11-05T17:44:49+5:30
Israel Palestine Conflict : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करणाऱ्या निदर्शकांना पोलिसांनी रोखलं.
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धात मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे. गाझा पट्टीच्या आजूबाजूच्या समुदायांवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करणाऱ्या निदर्शकांना पोलिसांनी रोखलं. निळे आणि पांढरे इस्रायली झेंडे फडकावत "आता तुरुंगात जा!" अशी घोषणाबाजी केली. हजारो लोकांनी जेरुसलेममधील नेतन्याहू यांच्या निवासस्थानाभोवती असलेलं पोलीस बॅरियर देखील पार केलं.
एका सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की तीन चतुर्थांश इस्रायली लोकांचं मत आहे की नेतन्याहू यांनी राजीनामा द्यावा. नेतन्याहू यांनी अद्याप अपयशाची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारली नाही ज्यामुळे अचानक हल्ला झाला. हमासने 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलवर हल्ला केला, 1,400 हून अधिक ठार केले आणि किमान 240 लोकांना ओलीस ठेवलं. लोकांचा संताप हळूहळू वाढला आहे, गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या अनेक कुटुंबांनी सरकारच्या प्रतिसादावर जोरदार टीका केली आणि त्यांच्या नातेवाईकांना घरी आणण्याची मागणी केली.
तेल अवीवमध्ये, हजारो लोकांनी झेंडा हातात घेऊ निदर्शनं केली. कोणतीही किंमत मोजून ओलिसांची सुटका करा अशा घोषणा असलेले पोस्टर्स हातात होते. इस्रायलने गाझामध्ये हवाई आणि जमिनीवर हल्ले केले आहेत, 9,000 हून अधिक लोक मारले आहेत. युद्धापूर्वीही, नेतन्याहू भ्रष्टाचाराच्या आरोपांशी लढत होते. त्यानंतर आता हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत.
शनिवारी, इस्रायलच्या चॅनल 13 टेलिव्हिजनच्या सर्वेक्षणात असे आढळून आले की 76% इस्रायली लोकांना वाटतं की आता पंतप्रधान म्हणून काम करणाऱ्या नेतन्याहू यांनी राजीनामा द्यावा. तर 64% लोकांनी युद्धानंतर लगेचच निवडणुका घ्याव्यात असं म्हटलं आहे. सर्वेक्षणानुसार, हल्ल्यासाठी सर्वात जास्त कोण जबाबदार आहे असं विचारलं असता, 44% इस्रायलींनी नेतन्याहू यांना दोष दिला, तर 33% लोकांनी लष्कर प्रमुख आणि वरिष्ठ आयडीएफ अधिकार्यांना दोषी धरले आणि 5% लोकांनी संरक्षण मंत्री यांना दोष दिला.