कोरोना टेस्ट किट बनवणाऱ्या फॅक्टरीतून लोकांना काढलं बाहेर; पोलिसांवर फेकले औषधांचे बॉक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 08:25 PM2023-01-08T20:25:42+5:302023-01-08T20:34:58+5:30

सोशल मीडियावर हिंसाचाराचे व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहेत. आंदोलक औषधांचे रिकामे बॉक्स आणि स्टूल पोलिसांवर फेकत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

protesters clash with police at antigen kit maker factory in china | कोरोना टेस्ट किट बनवणाऱ्या फॅक्टरीतून लोकांना काढलं बाहेर; पोलिसांवर फेकले औषधांचे बॉक्स

कोरोना टेस्ट किट बनवणाऱ्या फॅक्टरीतून लोकांना काढलं बाहेर; पोलिसांवर फेकले औषधांचे बॉक्स

googlenewsNext

चीनमध्ये कोविड टेस्ट किट बनवणाऱ्या फॅक्ट्रीमध्ये रविवारी हिंसाचार झाला. आंदोलकांनी पोलिसांवर औषधांचे बॉक्स फेकून मारले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे लोक कामावरून काढून टाकल्यामुळे आणि पगार न मिळाल्याने संतापले होते. त्यांनी विरोध केल्यावर पोलिसांनी त्यांना रोखले आणि त्यामुळे हिंसाचार झाला. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, चोंगकिंग शहरात कोविड टेस्ट किट बनवणाऱ्या जेबिओ कंपनीने अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आणि पगारही दिला नाही. 

कारखान्याबाहेर आंदोलकांची सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झटापट झाली. सोशल मीडियावर हिंसाचाराचे व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहेत. आंदोलक औषधांचे रिकामे बॉक्स आणि स्टूल पोलिसांवर फेकत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलीस धावताना दिसत आहेत. त्याने हेल्मेट आणि सुरक्षा उपकरणे परिधान केली आहेत. व्हिडिओमध्ये लोक घोषणाबाजी करताना ऐकू येतात. आमचे पैसे परत करा असं म्हणत आहेत.

एका युजरने पोस्ट शेअर करताना हा झिरो-कोविड पॉलिसी हटवल्याचा परिणाम आहे, आता कोरोनाच्या काळात वापरले जाणारे प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना काढून टाकत आहेत. कारण त्यांच्या मते, आता उत्पादन कमी होईल, त्यामुळे कंपनीत जास्त लोकांची गरज नाही असं म्हटलं आहे. चीन कम्युनिस्ट पार्टीवर देखरेख ठेवणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेंग यांनीही या संघर्षाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

झेंग यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना चाचणी किट बनवणाऱ्या कंपनीतून सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले, त्यानंतर निदर्शने सुरू झाली. हिंसाचाराचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर #ChongqingDadukouPharmaceuticalFactory सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. चीनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वीबोवर त्यावर बंदी घालण्यात आली होती. हे चिनी प्लॅटफॉर्म ट्विटरसारखे आहे. खरं तर, 3 वर्षांपासून कठोर कोरोना नियम लागू करणाऱ्या चीन सरकारने यू-टर्न घेत झिरो कोविड पॉलिसी हटवली होती. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढले. बाधितांच्या संख्येबाबत रिअल-टाइम डेटा जारी करण्यासही सरकारने नकार दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: protesters clash with police at antigen kit maker factory in china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.