आंदोलकांना हिंसाचार न करण्याचा इशारा

By admin | Published: May 27, 2014 05:56 AM2014-05-27T05:56:41+5:302014-05-27T05:56:41+5:30

बंडाचे नेते जनरल प्रत्युथ चान ओचा यांना थायलंडच्या राजांचा पाठिंबा मिळाला असून, त्यामुळे बळ प्राप्त झालेल्या पंतप्रधानांनी लष्कराविरोधात आंदोलन करणार्‍या नागरिकांना हिंसाचार न करण्याचा इशारा दिला

The protesters warn against violence | आंदोलकांना हिंसाचार न करण्याचा इशारा

आंदोलकांना हिंसाचार न करण्याचा इशारा

Next

बँकॉक : बंडाचे नेते जनरल प्रत्युथ चान ओचा यांना थायलंडच्या राजांचा पाठिंबा मिळाला असून, त्यामुळे बळ प्राप्त झालेल्या पंतप्रधानांनी लष्कराविरोधात आंदोलन करणार्‍या नागरिकांना हिंसाचार न करण्याचा इशारा दिला असून, शक्य तितक्या लवकर निवडणुका घेण्याचे आश्वासन दिले आहे. सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जनरल प्रयुथ यांनी शुभ्र गणवेश घातला होता व त्यांच्याबरोबर बारापेक्षा जास्त लष्करी अधिकारी होते. थायलंडच्या राजांनी आपल्याला सत्ता राबविण्यास मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले. मला कोणाशीही वाद घालायचा नाही, सर्व काही खुलेपणाने बोलून प्रश्न सोडवायचे आहेत, असे जन. प्रयुथ सत्तांतरानंतर घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत म्हणाले. माझ्यावर टीका करूनका, नव्या समस्या निर्माण करूनका, शक्य तर मला मदत करा असे आवाहन त्यांनी केले. बँकॉकमध्ये ठाण मांडून बसलेल्या आंदोलकांना त्यांनी हा इशारा दिला आहे. लोक लष्करविरोधी निदर्शनासाठी एकत्र येत आहेत, तुम्हाला पुन्हा जुने दिवस हवे आहेत काय? तसे असेल तर मला जबरदस्तीने कायदा व सुव्यवस्था राबवावी लागेल. निदर्शने थांबवा अन्यथा ती जबरदस्तीने थांबवावी लागतील, असे त्यांनी सांगितले. रविवारी एक हजार लोक लष्करविरोधातील निदर्शनासाठी बँकॉक शहरात रस्त्यावर आले होते. थायलंडच्या माजी पंतप्रधान र्इंगलुक शिनवात्रा यांची लष्करी शासकांनी सोमवारी सुटका केली. त्यांनी तीन दिवसांपुर्वी झालेल्या सत्तापालटानंतर लष्कराद्वारे ताब्यात घेण्यात आले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: The protesters warn against violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.