पूूज्य जोगिणीला पोपनी केले संतपद बहाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2019 04:49 AM2019-10-14T04:49:21+5:302019-10-14T04:49:33+5:30

मृत्यूनंतर ९५ वर्षांनी केरळमधील मरियम थ्रेसिया यांचा गौरव; रुग्णांची शुश्रुषा, एकाकी लोकांना दिलासा

Pujya Jogini was given the papacy | पूूज्य जोगिणीला पोपनी केले संतपद बहाल

पूूज्य जोगिणीला पोपनी केले संतपद बहाल

Next

व्हॅटिकन सिटी : केरळमधील शेकडो वर्षांच्या जुन्या सिरो-मलबार चर्चच्या मरियम थ्रेसिया या जोगिणीसह एकूण पाच जणांना पोप फ्रान्सिस यांनी रविवारी कॅथलिक ख्रिश्चनांचे पूज्य संत म्हणून घोषित केले. त्रिचूर येथे मे १९१४ मध्ये ‘सिस्टर्स आॅफ दी होली फॅमिली’ची स्थापना करणाऱ्या मरियम थ्रेसिया यांना मृत्यूनंतर तब्बल ९५ वर्षांनी संतपदाचे भाग्य लाभले.


येथील सेंट पीटर्स स्वेअरमध्ये झालेल्या विशेष भव्य समारंभात पोप फ्रान्सिस यांनी मरियम थ्रेसिया यांच्याखेरीज ज्यांना संतपद बहाल केले केले त्यांत इंग्लंडचे कार्डिनल जॉन हेनरी न्यूमन, स्वित्झर्लंडमधील एक सर्वमान्य ख्रिश्चन भाविक मार्गारेट बेज, ब्राझिलच्या सिस्टर ड्युलसे लोपेज व इटालिच्या सिस्टर
ग्युसेपिना वान्निनी यांचा समावेश आहे.
लाखो भाविकांच्या उपस्थितीत झालेल्या या समारंभात पाचही नव्या संतांची भलीमोठी पोट्रेट सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या इमारतीवर दिमाखात लावण्यात आली होती.


संतपद मिळण्यासाठी संबंधित व्यक्तिच्या दैवी शक्तिने झालेले, ज्याचे वैज्ञानिक तर्काने स्पष्टिकरण होऊ शकत नाही, असे दोन चमत्कार पोपकडून मंजूर होणे आवश्यक असते. मरियम थ्रेसिया यांच्या नावे असलेला एक चमत्कार सन २००९ मधील होता. जगण्याची आशा सोडलेल्या एका अपुºया दिवसांनी जन्माला आलेल्या अर्भकाच्या छातीवर मरियम यांचे पवित्र अंश ठेवल्यानंतर त्याचे प्राण वाचले होते.


रविवारी मरियम थ्रेसिया यांच्या संतपदाच्या समारंभास जीवनदान मिळालेले ते मूल, त्याचे डॉक्टर यांच्यासह केरळमधील चर्चच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह शेकडो भाविक आवर्जून उपस्थित होते. याखेरीज परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या नेतृत्वाखाली केरळमधील अनेक संसद सदस्यांचा समावेश असलेले भारताचे एक राजकीय शिष्टमंडळही हजर होते.
मरियम थ्रेसिया यांच्या या गौरवाने केरळच्या सिरो-मलबार चर्चचे आता चार संत झाले आहे. याआधी संतपद मिळालेल्यांमध्ये सिस्टर अल्फोन्सो, फादर कुरियाकोस इलियस चावारा आणि सिस्टर युफ्रेशिया यांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)

पापक्षालनासाठी सोसले कष्ट
मरियम थ्रेसिया यांनी येशू ख्रिस्ताचे अनुकरण करीत गरिबांची सेवा केली, रुग्णांची सुश्रुषा केली आणि निराधार, एकाकी राहणाºया लोकांना दिलासा दिला. सैतानी प्रवृत्तींनी आयुष्यभर त्यांना त्रास दिला; पण इतरांच्या पापक्षालनासाठी त्यांनी हे क्लेष निमूटपणे सोसले.
(व्हॅटिकन न्यूजमधील सन्मान)

Web Title: Pujya Jogini was given the papacy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.