पुलवामा हल्ला भ्याड आणि अक्षम्य, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने केला निषेध 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 09:02 AM2019-02-22T09:02:30+5:302019-02-22T09:04:06+5:30

पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसलळेली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवरही या हल्ल्याविरोधात भारताला साथ मिळू लागली आहे.

Pulwama attack : resolution passed by the UNSC | पुलवामा हल्ला भ्याड आणि अक्षम्य, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने केला निषेध 

पुलवामा हल्ला भ्याड आणि अक्षम्य, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने केला निषेध 

Next
ठळक मुद्देलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसलळेली आहेआंतरराष्ट्रीय पातळीवरही या हल्ल्याविरोधात भारताला साथ मिळू लागली आहेसंयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनेही हा हल्ला अक्षम्य आणि भ्याड असल्याचे सांगत या हल्ल्याचा निषेध केला


संयुक्त राष्ट्रे - पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसलळेली आहे. या हल्ल्यातील शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात येत आहे. आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही या हल्ल्याविरोधात भारताला साथ मिळू लागली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनेही हा हल्ला अक्षम्य आणि भ्याड असल्याचे सांगत या हल्ल्याचा निषेध केला आहे. सुरक्षा परिषदेने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा उल्लेख करत अशा निंदनीय हल्ल्यातील दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी अपेक्षा सुरक्षा परिषदेने व्यक्त केली आहे.  संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने पारित केलेला हा ठराव हा पाकिस्तानला धक्का असल्याचे मानले जात आहे. 

 संयुक्त राष्ट्रांमध्ये पारित करण्यात आलेल्या या प्रस्तावाचे वैशिष्ट्य म्हणजे या सुरक्षा परिषदेने आपल्या प्रस्तावामध्ये दहशतवादी मसूद अझहर याच्या जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा उल्लेख केला आहे. या सुरक्षा परिषदेमध्ये चीनचाही समावेश आहे. तसेच मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या मागणीबाबत चीनने याआधी नकाराधिकाराचा वापर केलेला होता. पुलवामा हल्ल्याला कारणीभूत ठरलेल्यांविरोधात कारवाईसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताला सहकार्य करावे असे आवाहनही सुरक्षा परिषदेने या प्रस्तावाच्या माध्यमातून केले आहे.  

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Web Title: Pulwama attack : resolution passed by the UNSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.