गर्भपात करणा-या महिलांना शिक्षा द्या - डोनाल्ड ट्रम्प
By admin | Published: March 31, 2016 09:02 AM2016-03-31T09:02:11+5:302016-03-31T09:29:14+5:30
वादग्रस्त विधाने करुन चर्चेत रहाणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी महिलांसंबंधी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
विसकॉन, दि. ३१ - वादग्रस्त विधाने करुन चर्चेत रहाणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाचे संभाव्य उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी महिलांसंबंधी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. ज्या महिला गर्भपात करतात त्यांना शिक्षा झाली पाहिजे असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले.
ती शिक्षा काय असावी हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. एमएसएनबीसीच्या ख्रिस मॅथ्यूजसोबत झालेल्या वादळी चर्चेमध्ये बोलताना ट्रम्प यांनी हे विधान केले. रिपब्लिकन पक्षाकडून अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प सध्या आघाडीवर आहेत.
विसकॉनसीन राज्यामध्ये ही चर्चा झाली. गर्भपातावर पूर्ण बंदी घालावी का ? या विषयावर बोलताना त्यांनी गर्भपात करणा-या महिलांना शिक्षा झाली पाहिजे असे वादग्रस्त विधान केले.
ट्रम्प यांच्या या विधानावर डेमोक्रॅटिक पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या हिलरी क्लिंटन यांनी जोरदार टिका केली आहे. या विधानातून ट्रम्प यांचे घृणास्पद आणि खालच्या पातळीचे विचार दिसतात. ते दुस-या रिपब्लिकन्सपेक्षा वेगळे नाहीत अशी टिका हिलरी यांनी केली आहे.
Even by his impossibly low standards, @realDonaldTrump's suggestion that women be punished for seeking abortion is abhorrent.
— Hillary Clinton (@HillaryClinton) March 30, 2016
The fact is, Trump isn't that different from every other Republican candidate who would also outlaw abortion.
— Hillary Clinton (@HillaryClinton) March 30, 2016