VIDEO: मुलाने कुत्र्याच्या पिल्लाला दिलं तलावात फेकून, मगरीने जिवंत गिळलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 07:53 PM2018-02-26T19:53:26+5:302018-02-26T19:57:32+5:30

सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने मुक्या जनावरांवरील हिंसाचाराची परिसीमा गाठली आहे

puppy eaten alive after boy throws it into crocodile infested lake | VIDEO: मुलाने कुत्र्याच्या पिल्लाला दिलं तलावात फेकून, मगरीने जिवंत गिळलं

VIDEO: मुलाने कुत्र्याच्या पिल्लाला दिलं तलावात फेकून, मगरीने जिवंत गिळलं

Next

सिडनी - मुक्या जनावरावर झालेल्या अत्याचाराच्या अनेक घटना आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. पण सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने हिंसाचाराची परिसीमा गाठली आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगा कुत्र्याला तलावात फेकून देतो, यानंतर तलावातील मगर त्या कुत्र्याची शिकार करुन जिवंत गिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यापासून लोक संताप व्यक्त करत आहेत. 36 सेकंदाचा हा व्हिडीओ पाहताना अंगावर अक्षरश: काटा उभा राहतो. ही दृश्य तुम्हाला विचलित करु शकतात. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, हा धक्कादायक व्हिडीओ ऑस्ट्रेलियामधील आहे. 

या व्हिडीओत दिसणारा मुलगा आणि ज्या व्यक्तीने शूट केलं आहे त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. व्हिडीओत दिसत असल्याप्रमाणे शर्ट आणि जीन्स घातलेला मुलगा दगडांवरुन खाली उतरतो आणि तलावाच्या किना-यावर पोहोचल्यानंतर हातातील कुत्र्याच्या पिल्लाला पाण्यात फेकून देतो. मुलगा सर्व शक्ती पणाला लावून पिल्लाला जितक्या लांब फेकू शकतो तितकं लांब फेकून देतो. 

पाण्यात पडल्यानंतर जीव वाचवण्यासाठी पिल्लू पाण्यात पोहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र तितक्यात अनपेक्षितपणे एक मगर पिल्लावर हल्ला करते. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे हतबल पिल्लू काहीच करु शकत नाही आणि मगरीच्या भक्ष्यस्थानी पडलं. हा व्हिडीओ पाहताना त्या पिल्लाची दया येते आणि तितकाच त्या मुलाचा संताप. 

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून युजर्स संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. अनेकजण पिल्लाला फेकलं तसंच त्या मुलाला फेकलं पाहिजे असं म्हणत आहेत. 

Web Title: puppy eaten alive after boy throws it into crocodile infested lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.