अंतराळवीरांच्या लघवी, घामातून मिळवले शुद्ध पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 07:06 AM2023-06-29T07:06:31+5:302023-06-29T07:06:55+5:30

Astronauts: आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर (आयएसएस) असलेल्या अंतराळवीरांनी घाम आणि लघवीचा पुनर्वापर करून ९८ टक्के पिण्यायोग्य पाण्यात रूपांतरित करण्यात यश मिळवले आहे. पर्यावरण नियंत्रण आणि जीवन समर्थन प्रणालीमुळे (ईसीएलएसएस) हे शक्य झाले आहे.

Pure water obtained from the urine and sweat of astronauts | अंतराळवीरांच्या लघवी, घामातून मिळवले शुद्ध पाणी

अंतराळवीरांच्या लघवी, घामातून मिळवले शुद्ध पाणी

googlenewsNext

वॉशिंग्टन :  आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर (आयएसएस) असलेल्या अंतराळवीरांनी घाम आणि लघवीचा पुनर्वापर करून ९८ टक्के पिण्यायोग्य पाण्यात रूपांतरित करण्यात यश मिळवले आहे. पर्यावरण नियंत्रण आणि जीवन समर्थन प्रणालीमुळे (ईसीएलएसएस) हे शक्य झाले आहे. हे पुनर्वापर केलेले पाणी छोट्या आणि मोठ्या अंतराळ मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. कारण यामुळे त्यांची पाण्याची गरज तेथेच पूर्ण होऊ शकेल.

अंतराळ केंद्रात प्रत्येक अंतराळवीराला पिणे, खाणे आणि दात घासण्यासाठी दररोज सुमारे ३.७८ लिटर (सुमारे एक गॅलन) स्वच्छ पाणी लागते. अंतराळात दीर्घकाळ राहण्यासाठी आणि भविष्यातील मोठी मोहिमा पूर्ण करण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट पाणी आहे. अंतराळ केंद्रातील शास्त्रज्ञांनी एका पद्धतीने ९८ टक्के पाणी पुन्हा मिळवले आहे. याकडे मोठे उपलब्धी म्हणून पाहिले जात आहे. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने याबाबत माहिती दिली.

अंतराळवीरांनी ईसीएलएसएसचा भाग असलेल्या प्रणालींचा वापर केला. ईसीएलएसएस म्हणजे पर्यावरण नियंत्रण आणि जीवनरक्षक प्रणाली, ज्याचे उद्दिष्ट अंतराळात पुढील वापरासाठी अन्न, हवा आणि पाणी यासारख्या गोष्टींचा पुनर्वापर करणे आहे.

 लघवीत आढळले  ९८ टक्के शुद्ध पाणी  
या प्रक्रियेचे उप-उत्पादन म्हणून ब्राइन तयार केले जाते, ज्यामधून सांडपाणी काढून टाकण्यासाठी ब्राइन प्रोसेसर असेम्बली (बीपीए) यूपीएमध्ये जोडली जाते. 

- जॉन्सन अंतराळ केंद्रातील पथकाचा एक भाग असलेल्या क्रिस्टोफर ब्राऊन यांनी सांगितले की, बीपीएने मूत्रातून स्वच्छ पाण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवरून ९८ टक्क्यांपर्यंत वाढवले, जे आतापर्यंतचे सर्वाधिक आहे. पिण्यायोग्य पाणी पुन्हा मिळवण्याची ही पद्धत मंगळासारख्या लांब अंतराळ मोहिमांमध्ये मदत करू शकते.

श्वास आणि घामाच्या आर्द्रतेतून मिळवतात पाणी
ईसीएलएसएस बनवणाऱ्या हार्डवेअरमध्ये पाणी पुन्हा मिळवण्याची प्रणाली समाविष्ट असते जी सांडपाणी गोळा करते आणि ते पिण्यायोग्य पाणी तयार करणाऱ्या वॉटर प्रोसेसर असेम्बलीकडे पाठवते. अंतराळवीरांचा श्वासोच्छ्वास आणि घामाद्वारे हवेत येणारा ओलावा एकत्र करण्यासाठी डिह्युमिडिफायर वापरला जातो. तर, युरिन प्रोसेसर असेम्बली मूत्रातून पाणी काढून टाकण्यासाठी व्हॅक्यूम डिस्टिलेशन वापरते.

Web Title: Pure water obtained from the urine and sweat of astronauts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.