व्हिस्कॉन्सिनमध्ये ट्रम्प, हिलरींना धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2016 10:29 PM2016-04-06T22:29:26+5:302016-04-07T04:07:53+5:30
व्हिस्कॉन्सिन राज्यातील प्राथमिक निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे टेड क्रूज आणि डेमोक्रॅटिक पार्टीचे बर्नी सँडर्स यांनी त्यांचे तगडे प्रतिस्पर्धी अनुक्रमे डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन
मिल्वाउकी : व्हिस्कॉन्सिन राज्यातील प्राथमिक निवडणुकीत रिपब्लिकन पार्टीचे टेड क्रूज आणि डेमोक्रॅटिक पार्टीचे बर्नी सँडर्स यांनी त्यांचे तगडे प्रतिस्पर्धी अनुक्रमे डोनाल्ड ट्रम्प आणि हिलरी क्लिंटन यांना बुधवारी पराभवाची धूळ चारली. हा विजय क्रूज व सँडर्स यांच्यासाठी पक्षाची उमेदवारी मिळविण्याच्या लढाईतील टर्निंग पॉईंट ठरला आहे.
अमेरिकन अध्यक्षपद निवडणुकीसाठी रिपब्लिकन व डेमोक्रॅ्रटिक पक्षाकडून उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत अनुक्रमे ट्रम्प व हिलरी आघाडीवर आहेत. तथापि, व्हिस्कॉन्सिनमध्ये त्यांना क्रूज व सँडर्स यांच्याकडून मात मिळाली. ट्रम्प यांना ३५.१ टक्के मते प्राप्त झाली, तर क्रूज यांना ४८.३ टक्के मतदारांचा पाठिंबा मिळाला. जॉन कॅसिच तिसऱ्या स्थानावर राहिले. त्यांच्या बाजूने रिपब्लिकनच्या १४ टक्के मतदारांनी कौल दिला.
दुसरीकडे सँडर्स यांनी ५६.५ टक्के मते मिळवत डेमोक्रॅटिकची व्हिस्कॉन्सिनमधील प्राथमिक निवडणूक जिंकली आहे. हिलरी यांना ४३.१ टक्के मतांवर समाधान मानावे लागले. सँडर्स यांनी अलीकडे हिलरी यांच्या विरुद्ध मिळविलेला हा सलग सहावा विजय आहे. (वृत्तसंस्था)