पुतिन-मोदींची चर्चा, भारत-रशियामध्ये १६ महत्त्वाचे करार
By admin | Published: October 15, 2016 04:14 PM2016-10-15T16:14:00+5:302016-10-15T16:21:06+5:30
भारत आणि रशियामध्ये संरक्षण, पायाभूत सुविधा, विज्ञान, रिसर्च, अंतराळ संशोधन आणि अन्य महत्त्वाच्या मुद्यांवर विविध क्षेत्रांशी संबंधित महत्त्वपूर्ण करार झाले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 15 - भारत आणि रशियामध्ये संरक्षण, पायाभूत सुविधा, विज्ञान, रिसर्च, अंतराळ संशोधन आणि अन्य महत्त्वाच्या मुद्यांवर विविध क्षेत्रांशी संबंधित महत्त्वपूर्ण करार झाले आहेत. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीनंतर दोन्ही देशांतील 16 महत्त्वपूर्ण करारांची घोषणा करण्यात आली. दोन्ही देशांनी दहशतवादाविरोधातील एकमेकांच्या भूमिकांचे समर्थन केले आणि विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर देण्याचे ठरवले आहे.
हवाई संरक्षणाला अधिक बळकटी देण्याच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून S-400 ट्रीम्फ (Triumf) हे मिसाइल सिस्टम घेण्याचे ठरवले आहे. याशिवाय भारतात कामोव हेलिकॉप्टर्सची निर्मित करण्याबाबतही संमती दर्शवण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रात भागीदारी मजबूत करण्यासाठी दोन्ही देश लष्करी उद्योगसंदर्भातील वार्षिक परिषदही घेतील, असे यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. S-400 ट्रीम्फ मिसाइल सिस्टमची 400 किलोमीटरपर्यंतच्या हवाई कक्षेत मारा करण्याची क्षमता आहे. या कराराची किंमत पाच मिलियन डॉलर एवढी आहे. शस्त्रूचे मिसाइस आपल्या विमान अथवा कुठल्या संस्थानवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे मिसाइल सिस्टम फार कमी वेळात त्याला नेस्तनाबूत करेल, असे मिसाइलचे वैशिष्ट्य आहे
Goa: Exchange of MOUs between India and Russia #BRICS2016pic.twitter.com/1HZiDU6CiX
— ANI (@ANI_news) October 15, 2016
दरम्यान, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेषतः दहशतवादाचा मुद्दाही उपस्थित केला. 'भारत आणि रशियाची दहशतवादाविरोधातील विचार एकसारखे आहेत. सीमेवरील दहशतवादी हल्ल्यांविरोधात कारवाई करण्याच्या भारताच्या भूमिकेला समर्थन दिल्याबद्दल आम्ही रशियाचे आभार मानतो'. असेही मोदींनी म्हटले आहे. दहशतवादाविरोधातील कठोर भूमिका आणि अफगाणिस्तानातील सद्यपरिस्थिती यावरही दोन्ही देशांचे एकमत झाले आहे. यावेळी उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा रशियाने निषेधही व्यक्त केला.
Goa: PM Modi & President Putin witness exchange of 16 agreements and 3 announcements across different fields #BRICS2016pic.twitter.com/1s37AIZtIi
— ANI (@ANI_news) October 15, 2016
Goa: PM Narendra Modi and Russian President Vladimir Putin begin with restricted talks #BRICS2016 (Pic Source: MEA) pic.twitter.com/h1hTzKjM9P
— ANI (@ANI_news) October 15, 2016