पुतीन पुन्हा सत्तेत येणार, दीर्घकाळ सत्तेत राहाणारे हे नेते तुम्हाला माहिती आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 04:45 PM2018-03-16T16:45:38+5:302018-03-16T16:45:38+5:30
रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे रविवारी पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुमारे पाव शतक देश चालवण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
मुंबई- रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे रविवारी पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुमारे पाव शतक देश चालवण्याची संधी त्यांना मिळणार आहे. पावशतकापेक्षा अधिक काळ सत्तेत राहाणाऱ्या नेत्यांमध्ये ताजिकिस्तानचे अध्यक्ष एमोनॉली राखमोन, कॅमेरुनचे पॉल बिय, इक्वेटोरियल गिनीचे तिओदोरो ओबियांग न्गुएमा यांचा समावेश आहे.
सर्वाधीक काळ सत्ता उपभोगणारे नेते
क्युबा- सर्वाधिक काळ राज्यशकट हाकणाऱ्या यादीत क्युबाचे फिडेल कॅस्ट्रो यांचा क्रमांक सर्वात वरती लागतो. त्यांनी ४९ वर्षे सत्ता उपभोगली. २००८ साली त्यांनी सत्ता आपला भाऊ राऊल याच्याकडे सोपवली.
तैवान- तैवानचे पहिले अध्यक्ष चँग कै शैक यांनी ४७ वर्षे सत्तेत राहून दुसरा क्रमांक पटकावला आहे. ते चीनचेही राष्ट्राध्यक्ष होते. त्या कालावधीचाही यात समावेश आहे. १९७५ साली त्यांचा मृत्यू झाला.
उत्तर कोरिया- उत्तर कोरियाचे संस्थापक राष्ट्राध्यक्ष किम इल सुंग यांनी ४६ वर्षे सत्ता उपभोगली. त्यांचा १९९४ साली मृत्यू झाला. ते आजही कोरियाचे नेते आहेत असे मानले जाते.
लिबिया- मुअम्मर गदाफी हे २०११ पर्यंत सलग ४२ वर्षे अध्यक्ष होते. बंडखोरांनी बंड केले नसते तर आणखी काही काळ ते यापदावर राहिले असते.
गॅबन- तेलसंपन्न गॅबनचे राष्ट्राध्यक्ष ओमर बोंगो ओडिंबा हे ४१ वर्षे सत्तेत होते. त्यांचा मृत्यू २००९ साली झाला.
अल्बानिया- अल्बानियाचे एन्वर होक्सा हे १९८५ साली मृत्यू होईपर्यंत ४० वर्षे सत्तेत होते.
झिम्बाम्ब्वे- रॉबर्ट मुगाबे १९८० साली सत्तेत आले ते २०१७ पर्यंत झिम्बाब्वेची सूत्रे सांभाळथ होते. ३७ वर्षांनंतर त्यांना स्तता सोडावी लागली.
सध्या दीर्घकाळ सत्तेत असणारे नेते-
इक्वोटोरियल गिनी- सध्या सर्वाधीक काळ अध्यक्षपदावर राहिलेले म्हणून तिओदोरो ओबियांग न्गुएमा यांचं नाव घेतलं जातं. ते ३८ वर्षे सत्तेत आहेत. १९७९ साली त्यांनी आपल्या काकांना पदच्युत करुन सत्ता मिळवली.
कॅमेरुन- अध्यक्ष- पॉल बिया ३५ वर्षे
काँगो- अध्यक्ष डेनिस सासोऊ ३४ वर्षे (यामध्ये ५ वर्षांचा खंड मोजलेला नाही.)
कंबोडिया- पंतप्रधान हुन सेन ३३ वर्षे
युगांडा- अध्यक्ष योवेरी मुसेवेनी- ३२ वर्षे
इराण- सर्वोच्च नेते अयातोल्ला खोमेनी २९ वर्षे
सुदान- अध्यक्ष ओमर अल बशीर २८ वर्षे
कजाखस्तान- अध्यक्ष नुरसुलतान नजरबायेव २८ वर्षे
चाड- अध्यक्ष इद्रिस डेबी २७ वर्षे
ताजिकिस्तान- अध्यक्ष एमोमाली राखमोन २५ वर्षे
इरिट्रिया- अध्यक्ष इसायस अफ्वेर्की २४ वर्षे