रशियन संसदीय निवडणुकीत पुतिन यांच्या पक्षाचा विजय
By admin | Published: September 19, 2016 11:34 AM2016-09-19T11:34:30+5:302016-09-19T11:34:30+5:30
रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचे वर्चस्व कायम रहाणार आहे. संसदीय निवडणुकीत पुतिन यांच्या युनायटेड रशिया पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मॉस्को, दि. १९ - रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांचे वर्चस्व कायम रहाणार आहे. संसदीय निवडणुकीत पुतिन यांच्या युनायटेड रशिया पक्षाला घवघवीत यश मिळाले आहे. सोमवारी जाहीर झालेल्या निकालातून पुतिन यांची सत्ता कायम रहाणार असल्याचे स्पष्ट झाले.
आतापर्यंत ९० टक्के मतमोजणी पूर्ण झाली असून, ४५० सदस्यांच्या संसदेत युनायटेड रशिया पक्षाचे ३३८ सदस्य निवडून आले आहेत. रविवारी मतदानानंतर एक्झिट पोलमध्ये पुतिन यांचा पक्ष बाजी मारेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. निकालही तसेच लागले आहेत.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा ज्या प्रमाणे जागतिक राजकारणावर, धोरणांवर परिणाम होतो. त्या तुलनेत रशियाची निवडणूकी तितकी महत्वाची वाटत नसली तरी, जागतिक संतुलनाच्या दृष्टीकोनातून या निवडणुकीचे महत्व आहे. कारण अनेक मुद्यांवर अमेरिका आणि रशियामध्ये तीव्र मतभेद आहेत. वेळोवेळी या मतभेदांचा जागतिक राजकारणावर परिणाम झाला आहे.