पुतिन यांची सुपरकार...! ६ सेकंदांत गाठते १०० किमी वेग; बॉम्ब आणि बुलेटचाही होत नाही परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 01:12 PM2024-06-20T13:12:36+5:302024-06-20T13:15:20+5:30

आता पुन्हा एकदा पुतीन यांच्या ऑरस सीनेट कारचीही चर्चा सुरू झाली आहे. ही रशियन राष्ट्रपतींची आधिकृत कार आहे...

Putin's supercar aurus senat Holds a speed of 100 KM per hour in 6 seconds; Even bombs and bullets have no effect | पुतिन यांची सुपरकार...! ६ सेकंदांत गाठते १०० किमी वेग; बॉम्ब आणि बुलेटचाही होत नाही परिणाम

पुतिन यांची सुपरकार...! ६ सेकंदांत गाठते १०० किमी वेग; बॉम्ब आणि बुलेटचाही होत नाही परिणाम

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन उत्तर कोरियाचा दौरा पूर्ण करू आता व्हिएतनामला पोहोचले आहेत. त्यांचा, उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग उनसोबतचा एका कारमधील फटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या दोन्ही नेत्यांनी बुधवारी रशियामध्ये तयार झालेल्या ऑरस लिमोझिनमधून (Aurus Limousine ) फेरफटका मारण्याचा आनंद घेतला.

यातच, आता पुन्हा एकदा पुतीन यांच्या ऑरस सीनेट कारचीही चर्चा सुरू झाली आहे. ही रशियन राष्ट्रपतींची आधिकृत कार आहे. ही कार सोव्हियत काळातील ZIL लिमोझिनची रेट्रो-स्टाइल कार आहे. या कारने मर्सिडीज-बेंझ एस ६०० गार्ड पुलमनची जागा घेतली होती. गेल्या मे महिन्यात क्रेमलिन उद्घाटन समारंभावेळी पुतिन ऑरस सिनेटनेच गेले होते. 

रूशियामधील NAMI ने 'कोर्तेज' प्रोजेक्टचा एक भाग म्हणून ऑरस सीनेट डेव्हलप केली आहे. सेंट्रल सायंटिफिक रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ ऑटोमोबाईल्स अँड ऑटोमोटिव्ह इंजिन्स - NAMI ही एक वैज्ञानिक संस्था आहे जी रशियातील ऑटोमोटिव्ह उद्योग विकासाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.

ऑरस सीनेटची खासियत - 
या कारमध्ये एका राष्ट्रपतीच्या वाहनात आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आहेत. महत्वाचे म्हणजे, या कारमध्ये सुरक्षितता आणि कम्युनिकेशनसंदर्भातील आश्चर्य चकित करणारे फीचर्स आहेत. ही कार पूर्णपणे बुलेटप्रूफ असल्याचे, तसेच या कारवर बॉम्बचाही काही परिणाम होत नसल्याचे बोलले जाते. मात्र, असे असले तरी, या कारसंदर्भात फारशी माहिती कधीही समोर आलेली नाही. या कारमध्ये ४.४-लीटर ट्विन-टर्बो V८ चा वापर करण्यात आला आहे. जे ५९०bhp तयार करते. विशेष म्हणजे, ही कार ताशी ०-१०० किमी एवढा वेग केवळ सहा सेकंदांतच धारण करू शकते. तसेच हिचा जास्तीत जास्त वेग ताशी २४९ किमी एवढा आहे.

परदेश दौऱ्यावर असतानाही पुतीन यांच्यासोबत असते ही कार -
राष्ट्रपती पुतीन परदेश दौऱ्यावरही आपली ही कार सोबत ठेवतात. इलुशिन IL-७६ वाहतूक विमानाने ही कार त्यांच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचवली जाते. 

Web Title: Putin's supercar aurus senat Holds a speed of 100 KM per hour in 6 seconds; Even bombs and bullets have no effect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.