कतार निर्बंधांस विमान संघटनेचा विरोध

By Admin | Published: June 7, 2017 12:10 AM2017-06-07T00:10:27+5:302017-06-07T00:10:27+5:30

कतारवर लादलेल्या हवाई वाहतूक निर्बंधांना जागतिक विमान वाहतूक कंपन्यांच्या संघटनेने विरोध केला आहे

Qatar Resistance Aircraft Association | कतार निर्बंधांस विमान संघटनेचा विरोध

कतार निर्बंधांस विमान संघटनेचा विरोध

googlenewsNext

कॅनकन : पश्चिम आशियातील काही देशांनी कतारवर लादलेल्या हवाई वाहतूक निर्बंधांना जागतिक विमान वाहतूक कंपन्यांच्या संघटनेने विरोध केला आहे. आम्ही निर्बंधांच्या विरोधात असून कतारसोबतचे हवाई संबंध शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यात यावेत, अशी मागणी संघटनेने केली आहे. या निर्बंधामुळे भारतातील दिल्ली वगळता अन्य शहरातून दोहा येथील विमानप्रवास महाग आणि अधिक अंतराचा होणार आहे.
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक महासंघाचे (आएटा) सीईओ आणि महासंचालक अ‍ॅलेक्झांडर डे जुनियाक यांनी ही माहिती दिली. सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब आमिरात आणि बहारिन या देशांनी कतारसोबतचे राजनैतिक संबंध तोडले आहेत. त्यासोबतच कतारसोबतची हवाई वाहतूकही बंद करण्यात आली आहे. कतार एअरलाइन्स, एअर इंडिया आणि दोन भारतीय खासगी कंपन्यांची कतार येथे विमानसेवा आहे. निर्बंधांमुळे या कंपन्यांना सौदी अरेबिया व अन्य देशांची हवाई हद्द वापरता येणार नाही. त्यांना लांबचा प्रवास करावा लागेल. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढेल आणि भाडेही वाढेल, असे दिसते.
कतारमध्ये साडेसहा लाख भारतीय आहेत. ते तिथे रोजगारासाठी गेले असून, ते नियमितपणे भारतात येत असतात. त्यांनाही या निर्बंधांचा फटका बसेल. तसेच युरोपमध्ये कतारमार्गे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच घटेल. अन्य मार्गाने युरोपला जाण्यासाठी ते अर्थातच कतार एअरलाइन्स वगळता अन्य कंपन्यांची तिकिटे काढतील आणि त्याचा आर्थिक फटका कतार एअरलाइन्सला बसेल.
जुनाईक यांनी सांगितले की, भारतासह आशिया प्रशांत क्षेत्रातील हवाई वाहतूक गेल्या काही आठवड्यांत स्थिर होती. त्यातच २१ मार्च रोजी अमेरिकेने पश्चित आशिया आणि उत्त्तर अमेरिकेतील देशांना जाणाऱ्या विमानांत वैयक्तिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे नेण्यास बंदी घातली होती.
>भारतीयांना फटका
पश्चिम आशियाई देशांनी कतारवर घातलेल्या हवाई बंदीमुळे विमान प्रवास महागणार आहे. भारतीयांना त्याचा मोठा फटका बसेल. सौदी अरेबिया, इजिप्त, संयुक्त अरब आमिरात आणि बहारिन या देशांची अमेरिका अथवा युरोपला जाणारी विमाने आतापर्यंत दोहा मार्गेच जात होती. तसेच काही विमाने कतारवरून उड्डाण करत होती. दिल्लीहून जाणारी विमाने प्रामुख्याने हा मार्ग स्वीकारीत असत. हा जवळचा मार्ग आहे. आता त्यांना इराणमार्गे जावे लागेल. त्यामुळे आता तिकिटांचा खर्च वाढणार आहे. आधीच परदेशात गेलेल्या भारतीयांना त्याचा फटका बसेल.

Web Title: Qatar Resistance Aircraft Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.