Afghanistan Taliban Crisis: “तालिबानसारख्या ‘जिहाद’नं भारत-चीनमधील मुसलमानांची परिस्थिती सुधारेल”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 02:39 PM2021-08-19T14:39:05+5:302021-08-19T14:49:07+5:30

ओसामा बिन लादेन याला अमेरिकेकडे सोपवण्यास नकार देऊन तालिबानने त्यांची मर्दानगी सिद्ध केली होती असं कतारमधील प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ डॉ. अब्द अल अजीज अल खजराज अंसारीने म्हटलं आहे.

Qatari Sociologist Dr. Abd Al-Aziz Al-Khazraj Al-Ansari Statement on Afghanistan Taliban Crisis | Afghanistan Taliban Crisis: “तालिबानसारख्या ‘जिहाद’नं भारत-चीनमधील मुसलमानांची परिस्थिती सुधारेल”

Afghanistan Taliban Crisis: “तालिबानसारख्या ‘जिहाद’नं भारत-चीनमधील मुसलमानांची परिस्थिती सुधारेल”

Next
ठळक मुद्देअफगाणिस्तानात ताकदीच्या जोरावर सत्ता काबिज केल्यावर जर्मनी एक रुपयाची मदत करणार नाही.अफगाणी लोकांना आर्थिक मदतीसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढाकार घेतला पाहिजे - पाकिस्तानतालिबानी जर त्यांच्या मूळ स्वभावावर सत्ता चालवत असेल तर त्याला मान्यता दिली जाणार नाही

अफगाणिस्तानवर(Afghanistan) तालिबाननं(Taliban) कब्जा केल्यानंतर इस्लामिक कट्टरपंथींमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे. १९९७ पासून जिहाद पुकारल्यानंतर आता विजय मिळवला आहे. जगभरातील सर्व समस्यांचा तोडगा ताकदीनं आणि जिहादच्या माध्यमातून मिळू शकतो असं कतारमधील प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ डॉ. अब्द अल अजीज अल खजराज अंसारी यांनी म्हटलं आहे.

डॉ. अब्द अल अजीज अल खजराज अंसारी यांनी १६ ऑगस्टला यूट्यूबवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत म्हटलंय की, जगभरातील मुस्लिमांची परिस्थिती ठीक करण्यासाठी जिहाद करण्याची गरज आहे. सीरिया, यमन, चीन आणि भारतातील मुसलमानांची स्थिती जिहाद पुकारुन आणि फिलीपिंसप्रमाणे बळाचा वापर करुन सुधारली जाऊ शकते. जग केवळ ताकदीची भाषा समजते. ज्याचं चांगले उदाहरण म्हणजे नॉर्थ कोरिया. ज्याच्या नेत्याजवळ डोनाल्ड ट्रम्प कुत्र्यासारखं बूट घेऊन पोहचला होता असं तीव्र भाष्य त्यांनी केले आहे.

त्याचसोबत ओसामा बिन लादेन याला अमेरिकेकडे सोपवण्यास नकार देऊन तालिबानने त्यांची मर्दानगी सिद्ध केली होती. तेव्हा अरब नेता अमेरिकेच्या मागे लागले होते. आपण मुसलमान आहोत, गद्दारांसमोर झुकत नाही असंही अल यांनी म्हटलं आहे. यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी तालिबानी सत्तेवर प्रतिक्रिया दिली होती. अफगाणिस्तान गुलामगिरीतून मुक्त झाला असं ते म्हणाले होते. तर तालिबानींनी महिलांवरील शिक्षा रोखली नाही असं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी सांगितले आहे.

पाकिस्तानी पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत निवेदन आलं त्यात म्हटलं की, जर्मन चांसरल एंजेला मर्केल यांनी पंतप्रधान इमरान खान यांना फोन केला होता. यावेळी दोन नेत्यांमध्ये अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर चर्चा केली. पाकिस्तान अफगाणिस्तानच्या नेत्यांशी चर्चा करत आहे. परंतु अफगाणी लोकांना आर्थिक मदतीसाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढाकार घेतला पाहिजे असं पाकिस्तान म्हणाले. मर्केल यांनी यापूर्वीच तालिबानला संकेत देत सांगितलं होतं की, अफगाणिस्तानात ताकदीच्या जोरावर सत्ता काबिज केल्यावर जर्मनी एक रुपयाची मदत करणार नाही.

अमेरिकेसोबत अनेक देशांनी स्पष्ट केलंय की, तालिबानी जर त्यांच्या मूळ स्वभावावर सत्ता चालवत असेल तर त्याला मान्यता दिली जाणार नाही. तर तालिबान ही दहशतवादी संघटना आहे. त्यामुळे अफगाणिस्तानात तालिबानी सत्तेला मान्यता देणार नाही असं कॅनडा सरकारने स्पष्ट केले आहे.

Web Title: Qatari Sociologist Dr. Abd Al-Aziz Al-Khazraj Al-Ansari Statement on Afghanistan Taliban Crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.