भारताला सर्वात जवळचा भागीदार बनवण्याची बायडेन यांची इच्छा, PM मोदींचं केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 12:04 AM2022-05-25T00:04:09+5:302022-05-25T00:07:03+5:30

Quad Summit 2022: पीएम मोदी म्हणाले, 'अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन यांच्यासोबतची बैठक सार्थक ठरली. आज आम्ही व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, यांसह भारत-अमेरिका संबंधांच्या विविध पैलूंवर व्यापक चर्चा केली.'

quad summit 2022 Biden praises PM Modi wants to make india the closest partner | भारताला सर्वात जवळचा भागीदार बनवण्याची बायडेन यांची इच्छा, PM मोदींचं केलं कौतुक

भारताला सर्वात जवळचा भागीदार बनवण्याची बायडेन यांची इच्छा, PM मोदींचं केलं कौतुक

googlenewsNext

भारत आणि अमेरिकेचे संबंध म्हणजे 'विश्वासाची भागीदारी' आहे. आपण, अधिक समृद्ध, मुक्त आणि सुरक्षित जगासाठी राष्ट्रपती ज्यो बायडेन यांच्यासोबत काम करण्यास तयार आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यावेळी या दोन्ही नेत्यांनी भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही म्हटले आहे. या बैठकीनंतर, पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत राष्ट्रपती बायडेन यांच्यासोबतची बैठक सार्थक ठरल्याचे म्हटले आहे.

बैठकीसंदर्भात काय म्हणाले पीएम मोदी - 
पीएम मोदी म्हणाले, 'अमेरिकेचे राष्ट्रपती बायडेन यांच्यासोबतची बैठक सार्थक ठरली. आज आम्ही व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, यांसह भारत-अमेरिका संबंधांच्या विविध पैलूंवर व्यापक चर्चा केली.'

बायडेन यांची मोदींना जवळ करण्याची इच्छा - 
राष्ट्रपती बायडेन पंतप्रधान मोदींना म्हणाले, "भारतासोबत असलेली अमेरिकेची भागीदारी ही, पृथ्वीवरील सर्वात निकटतम भागीदारी बनविण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. एवढेच नाही, तर दोन्ही देश एकत्रितपणे खूप काही करू शकतात आणि करतीलही. याशिवाय, क्वाड शिखर सम्मेलनाच्या पूर्वसंध्येला बायडेन यांनी 12 हिंद-प्रशांत देशांसोबत एका नव्या व्यापार कराराला सुरुवात केली. याचा हेतू त्या देशांची अर्थव्यवस्था मजबूत करणे असा आहे. 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट करत सांगितले, की 'भारत-अमेरिकेची जागतिक धोरणात्मक आघाडी' पुढे नेत, पंतप्रधान मोदी आणि बायडेन यांनी द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर व्यापक चर्चा केली. दोन्ही नेत्यांत व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, तसेच भारत -अमेरिका संबंध पुढे नेण्याच्या मार्गांसंदर्भातही चर्चा झाली. एका वरिष्ठ अधिकाऱ्या म्हटल्यानुसार, क्वाड शिखर सम्मेलनाच्या एका सत्रादरम्यान बायडेन यांनी कोरोना महामारीचा लोकशाही पद्धतीने सामना केल्याबद्दल पीएम मोदींचे कौतुक केले. याच बरोबर, महामारीचा सामना करण्यात भारत चीनच्या तुलनेत अधिक यशस्वी ठरल्याचेही म्हटले आहे. 
 

 

Web Title: quad summit 2022 Biden praises PM Modi wants to make india the closest partner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.