Queen Elizabeth health update: ब्रिटनच्या राणीची प्रकृती खालावली, 96 वर्षीय क्वीन एलिझाबेथ डॉक्टरांच्या निगरानीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 09:02 PM2022-09-08T21:02:15+5:302022-09-08T21:18:29+5:30
British Queen health: ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे.
Britain Queen Elizabeth II health update: ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. बकिंघम पॅलेसने म्हटले की, राणी सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. एलिझाबेथ यांनी मंगळवारी औपचारिकपणे कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्या लिझ ट्रस यांची ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. ट्रस 96 वर्षीय राणीला भेटण्यासाठी स्कॉटलंडमधील अबर्डीनशायर येथील बालमोरल कॅसल या निवासस्थानी पोहोचल्या होत्या, पण प्रकृती बिघडल्यामुळे भेट रद्द करण्यात आली.
The whole country will be deeply concerned by the news from Buckingham Palace this lunchtime.
— Liz Truss (@trussliz) September 8, 2022
My thoughts - and the thoughts of people across our United Kingdom - are with Her Majesty The Queen and her family at this time.
दरम्यान, ब्रिटेनच्या नवनिर्वाचित पंतप्रधान लिझ ट्रस यांनी एलिझाबेथ यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ट्रस यांनी ट्विट केले की, बकिंघम पॅलेसकडून आलेल्या वृत्तामुळे संपूर्ण देश चिंतेत असेल. आम्ही एलिझाबेथ आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहोत. एलिझाबेथ यांच्याबाबत माहिती मिळताच प्रिन्स चार्ल्स आणि नातू प्रिन्स विल्यम राणीला भेटण्यासाठी निघाले आहेत.
सर्व बैठका रद्द
राणीची तब्येत बिघडल्यानंतर प्रिव्ही कौन्सिलची बैठक रद्द करण्यात आली असून, डॉक्टर राणीच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राणी गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना एपिसोडिक मोबिलिटीची समस्या आहे. या वयातील लोकांना ही समस्या असते.
सत्तेची 70 वर्षे पूर्ण
या वर्षी जूनमध्ये ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या कारकिर्दीला 70 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने चार दिवस मोठ्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समारंभाच्या तिसऱ्या दिवशी, प्रिन्स चार्ल्स आणि त्यांचा मुलगा प्रिन्स विल्यम यांनी बकिंगहॅम पॅलेससमोर एका खास मैफिलीत राणीचा सन्मान केला होता. यावेळी, आयोजित समारंभात सुमारे 22,000 लोक सामील झाले होते.