Queen Elizabeth II death : आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेली ब्रिटनची राणी एलिजाबेथ द्वितीय, कुणाला मिळणार ही संपत्ती?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 11:23 AM2022-09-09T11:23:46+5:302022-09-09T11:24:14+5:30
Queen Elizabeth II death : ती जगातली एकुलती एक अशी व्यक्ती होती जिला परदेश दौरा करताना व्हिसा किंवा पासपोर्टची गरज पडत नव्हती. सध्याच्या स्थितीत 15 देशांची महाराणी राहिलेली एलिजाबेथ द्वितीय आपल्या मागे अब्जो रूपयांची संपत्ती सोडून गेली आहे.
Queen Elizabeth II death : ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ द्वितीयचं (Queen Elizabeth II) गुरूवारी स्कॉटलॅंडच्या बाल्मोरल कॅसलमध्ये निधन झालं. 96व्या वयात त्या जगाला सोडून गेल्या. एलिजाबेथ द्वितीय 1952 मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर ब्रिटनची राणी झाली होती. त्यावेळी तिचं वय केवळ 25 वर्षे होतं. ती जगातली एकुलती एक अशी व्यक्ती होती जिला परदेश दौरा करताना व्हिसा किंवा पासपोर्टची गरज पडत नव्हती. सध्याच्या स्थितीत 15 देशांची महाराणी राहिलेली एलिजाबेथ द्वितीय आपल्या मागे अब्जो रूपयांची संपत्ती सोडून गेली आहे.
महाराणी एलिजाबेथ द्वितीयच्या नेटवर्थबाबत वेगवेगळ्या रिपोर्ट्समध्ये वेगवेगळे दावे केले जातात. Fortune नुसार, महाराणी एलिजाबेथ द्वितीय आपल्या मागे 500 मिलियन डॉलर म्हणजे 39,858,975,000 रूपयांची संपत्ती सोडून गेली. ही संपत्ती प्रिन्स चार्ल्सला मिळणार.
कसं होतं महाराणी उत्पन्न?
ब्रिटनच्या शाही परिवाराला टॅक्सपेअर्सकडून मोठी रक्कम मिळते. ज्याला सॉवरेन ग्रॅंन्टच्या रूपात मानलं जातं. या ग्रान्टची सुरूवात किंग जॉर्ज III पासून झाली होती. त्यांनी संसदेत एक कायदा पास केला होता. याप्रकारे त्यांनी त्यांच्यासाठी आणि भविष्यात येणाऱ्या पिढ्यांसाठी फंड मिळवण्याचा मार्ग तयार केला होता. या कराराला सिविल लिस्ट नावाने ओखळलं जातं. ज्याला 2012 मध्ये सोवरेन ग्रान्टच्या रूपात रिप्लेस करण्यात आलं होतं.
2021 आणि 2022 मध्ये सॉवरेन ग्रान्टची रक्कम 86 मिलियन पाउंडपेक्षा जास्त ठरवण्यात आली होती. हे रक्कम अधिकृत प्रवास, संपत्तीची देखरेख आणि राणीच्या बकिंघण पॅलेसच्या देखरेखीसाठी ठेवण्यात आली होती.
शाही घराण्याची अचल संपत्ती
फोर्ब्सनुसार, राजेशाही परिवाराकडे 2021 मध्ये जवळपास 28 बिलियन डॉलरची अचल संपत्ती होती. जी विकली जाऊ शकत नाही.
- द क्राउन इस्टेट - 19.5 बिलियन डॉलर
- बकिंघम पॅलेस - 4.9 बिलियन डॉलर
- द डची ऑफ कॉर्नवाल - 1.3 बिलियन डॉलर
- द डची ऑफ लॅंकेस्टर - 748 मिलियन डॉलर
- केंसिंग्टन पॅलेस - 630 मिलियन डॉलर
- स्कॉटलॅंडचा क्राउन इस्टेट - 592 मिलियन डॉलर
कुणाला मिळणार राणी संपत्ती?
बिझनेस इनसायडरनुसार, राणीने आपल्या गुंतवणुकीतून, कला संग्रहातून, ज्वेलरीतून आणि रिअस इस्टेट होल्डिंग्समधून व्यक्तीगतपणे 500 मिलियन डॉलरपेक्षा रक्कम जमा केली होती. यात सॅंड्रिघम हाउस आणि बाल्मोरल कॅसल यांचाही समावेश आहे. आता त्यांच्या मृत्यूमुळे ही संपत्ती प्रिन्स चार्ल्सकडे जाईल.
मोठा मुलगा चार्ल्सने सांभाळली गादी
आता एलिजाबेथ द्वितीयनंतर त्यांचा मोठा मुलगा चार्ल्स ब्रिटनचा राजा बनला आहे. 73 वर्षीय चार्ल्स ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलॅंडसहीत 15 देशांचा प्रमुख बनला आहे. शाही परिवाराच्या नियमानुसार, चार्ल्स यालाच एलिजाबेथ यांच्यानंतर गादी सांभाळायची होती. राणीच्या मृत्यूनंतर लगेच चार्ल्सला राजा घोषित केलं आहे.