Queen Elizabeth II death : कोहिनूर हिरा लावलेला राणी एलिजाबेथ द्वितीयचा शाही मुकूट आता कुणाला मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2022 12:04 PM2022-09-09T12:04:01+5:302022-09-09T12:05:34+5:30

Queen Elizabeth II Death: : प्रिवी काउन्सिलच्या बैठकीत प्रिन्स चार्ल्सला ब्रिटनचा नवा राजा घोषित करण्यात आलं आहे. यासोबतच त्याची पत्नी डचेस ऑफ कॉर्नवॉल कॅमिला हिला क्वीन कंसोर्टची उपाधी मिळेल. म्हणजे ती ब्रिटनची 'महाराणी' होईल.

Queen Elizabeth II death : Who will get the prized kohinoor crown after queen Elizabeth II | Queen Elizabeth II death : कोहिनूर हिरा लावलेला राणी एलिजाबेथ द्वितीयचा शाही मुकूट आता कुणाला मिळणार?

Queen Elizabeth II death : कोहिनूर हिरा लावलेला राणी एलिजाबेथ द्वितीयचा शाही मुकूट आता कुणाला मिळणार?

Next

Queen Elizabeth II Death: ब्रिटनची महाराणी क्वीन एलिजाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर राजेशाही परिवाराची जबाबदारी आता त्यांचा मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स याच्याकडे आली आहे. प्रिवी काउन्सिलच्या बैठकीत प्रिन्स चार्ल्सला ब्रिटनचा नवा राजा घोषित करण्यात आलं आहे. यासोबतच त्याची पत्नी डचेस ऑफ कॉर्नवॉल कॅमिला हिला क्वीन कंसोर्टची उपाधी मिळेल. म्हणजे ती ब्रिटनची 'महाराणी' होईल. रिपोर्ट्सनुसार, ब्रिटीश परिवाराचा कोहिनूर हिऱ्याचा मुकूटही (Queen Elizabeth II Crown) आता तिच्याकडेच राहणार. 

ब्रिटनमध्ये अनेक वर्षांच्या वादानंतर महाराणी एलिजाबेथ द्वितीयमुळे ही उपाधी ठरली. कॅमिलाला क्वीन कंसोर्ट ही पदवी देण्याचा निर्णय तेव्हाच करण्यात आला होता जेव्हा कॅमिला आणि चार्ल्स एकमेकांच्या जवळ येत होते. तेव्हा त्यांचं लग्नही ठरलं नव्हतं. हे निश्चित होतं की, 75 वर्षीय कॅमिला ही उपाधी घेणार.

कोहिनूर हा 105.6 कॅरेटचा हिरा आहे. जो शेकडो वर्षांआधी काढण्यात आला होता. हा हिरा 14 व्या शतकात भारतात सापडला होता आणि त्यावेळी वेगवेगळ्या शासकांकडे होता. 1849 मध्ये हा हिरा पंजाबमधील ब्रिटीशांकडे होता, नंतर हिरा महाराणी व्हिक्टोरियाकडे सोपवण्यात आला. तेव्हापासून तो ब्रिटीश क्राउनमध्ये लावला आहे. 

किती आहे राणीची संपत्ती?

महाराणी एलिजाबेथ द्वितीयच्या नेटवर्थबाबत वेगवेगळ्या रिपोर्ट्समध्ये वेगवेगळे दावे केले जातात. Fortune नुसार, महाराणी एलिजाबेथ द्वितीय आपल्या मागे 500 मिलियन डॉलर म्हणजे 39,858,975,000 रूपयांची संपत्ती सोडून गेली. ही संपत्ती प्रिन्स चार्ल्सला मिळणार.

शाही घराण्याची अचल संपत्ती

फोर्ब्सनुसार, राजेशाही परिवाराकडे 2021 मध्ये जवळपास 28 बिलियन डॉलरची अचल संपत्ती होती. जी विकली जाऊ शकत नाही. 

- द क्राउन इस्टेट - 19.5 बिलियन डॉलर

- बकिंघम पॅलेस - 4.9 बिलियन डॉलर

- द डची ऑफ कॉर्नवाल - 1.3 बिलियन डॉलर

- द डची ऑफ लॅंकेस्टर - 748 मिलियन डॉलर

- केंसिंग्टन पॅलेस - 630 मिलियन डॉलर

- स्कॉटलॅंडचा क्राउन इस्टेट - 592 मिलियन डॉलर

कुणाला मिळणार राणीची संपत्ती?

बिझनेस इनसायडरनुसार, राणीने आपल्या गुंतवणुकीतून, कला संग्रहातून, ज्वेलरीतून आणि रिअस इस्टेट होल्डिंग्समधून व्यक्तीगतपणे 500 मिलियन डॉलरपेक्षा रक्कम जमा केली होती. यात सॅंड्रिघम हाउस आणि बाल्मोरल कॅसल यांचाही समावेश आहे. आता त्यांच्या मृत्यूमुळे ही संपत्ती प्रिन्स चार्ल्सकडे जाईल.

Web Title: Queen Elizabeth II death : Who will get the prized kohinoor crown after queen Elizabeth II

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.