कतारचे 2क्22 चे यजमानपद अडचणीत

By admin | Published: June 2, 2014 11:49 PM2014-06-02T23:49:00+5:302014-06-02T23:49:00+5:30

फिफा विश्वकप 2क्22 चे यजमानपद कतारला बहाल करण्याच्या प्रकरणात भ्रष्टाचाराबाबतचे आरोप सिद्ध झाले, तर यजमानपदासाठी नव्याने मतदानप्रक्रिया राबवली जाऊ शकते,

The queue hostage crisis of 22nd | कतारचे 2क्22 चे यजमानपद अडचणीत

कतारचे 2क्22 चे यजमानपद अडचणीत

Next
>लंडन : फिफा विश्वकप 2क्22 चे यजमानपद कतारला बहाल करण्याच्या प्रकरणात भ्रष्टाचाराबाबतचे आरोप सिद्ध झाले, तर यजमानपदासाठी नव्याने मतदानप्रक्रिया राबवली जाऊ शकते, असे मत फिफाचे (आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ) स्वायत्त प्रशासकीय समितीचे अध्यक्ष लॉर्ड गोल्ड स्मिथ यांनी व्यक्त केले.
ब्रिटनमधील एका वृत्तपत्रने दावा केला आहे, की 2क्22 फिफा विश्वकपचे यजमानपद कतारला सोपविताना झालेल्या मतदान प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाला. अधिका:यांना कतारच्या पारडय़ात मत देण्यासाठी 5क् लाख डॉलर्सची रक्कम दिली गेली. ही बाब सिद्ध करण्यासाठी अनेक पुरावे असल्याचा दावा या वृत्तपत्रने केला आहे. ब्रिटनचे माजी अॅटर्नी जनरल व फिफाचे सदस्य असलेले गोल्ड स्मिथ म्हणाले,‘आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाला आपल्यावरील आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध करावे लागेल. आरोप जर सिद्ध झाले, तर कतारला यजमानपद बहाल करण्याचा निर्णय रद्द केला जाऊ शकतो.’ 
फिफाने या प्रकरणात तातडीने चौकशी समिती नेमली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अमेरिकन वकील मायकल गार्सिया यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती यावर्षी आपला अहवाल सादर करणार आहे. दरम्यान, आफ्रिकन फुटबॉल संघटनेचे प्रमुख व फिफाचे उपाध्यक्ष इसाक हयातू यांनी संडे टाइम्सच्या आरोपांचे खंडन केले आहे. कतारला यजमानपद बहाल करण्यासाठी कुठलीही भेट किंवा रक्कम लाच म्हणून स्वीकारलेली नाही, असे हयातू यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)

Web Title: The queue hostage crisis of 22nd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.