चंद्रावर लागलीय ससा-कासवाची स्पर्धा! कोण जिंकणार? रशियन लुनाचा गिअरच पडला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 10:57 AM2023-08-20T10:57:02+5:302023-08-20T10:57:48+5:30
लुना-25 च्या ऑटोमैटिक ऑनबोर्ड कॉम्प्युटरमध्ये इमर्जन्सी आली आहे. यामुळे रशियन स्पेस सेंटरचे तंत्रज्ञ याला आता वेळ लागणार आहे, असा राग आळवत आहेत.
भारतासाठी आज आनंदाचा आणि रशियासाठी चिंतेचा दिवस आहे. भारताच्या चंद्रयान ३ ने शेवटच्या डिबुस्टची फेरी यशस्वी पार पाडली आहे. तर भारताच्या मागून निघालेल्या परंतू आधी लँड करण्याच्या प्रयत्नात असलेल्या रशियाचा लुना चंद्र मोहिमेला धक्का बसला आहे. चंद्राच्या १०० किमीवरील ऑर्बिटमध्ये जाण्यासाठी प्रयत्नशील असताना अचानक लुनातील कॉम्प्युटरमध्ये एरर आला आणि रशियाचे सर्व गणितच बिघडले आहे.
लुना-25 च्या ऑटोमैटिक ऑनबोर्ड कॉम्प्युटरमध्ये इमर्जन्सी आली आहे. यामुळे रशियन स्पेस सेंटरचे तंत्रज्ञ याला आता वेळ लागणार आहे, असा राग आळवत आहेत. दुरुस्त करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर जाऊ शकत नाही, असे रशियन स्पेस एजन्सीने म्हटले आहे. वेळ लागेल. अशा परिस्थितीत लुना-25 चंद्रावर उतरण्यासही वेळ लागू शकतो, असे ते म्हणत आहेत.
लुना-25 लँडर शुक्रवारी, 11 ऑगस्ट रोजी पहाटे 4.40 वाजता रशियाच्या वोस्टोनी कॉस्मोड्रोम येथून प्रक्षेपित करण्यात आले. सोयुझ २.१बी रॉकेटमधून लुना-२५ चंद्रावर पाठवण्यात आले. त्याला लुना-ग्लोब मिशन असे नाव देण्यात आले आहे. पाच दिवसांत हे रॉकेट चंद्राची कक्षा गाठणार होते. तशी गाठलीही परंतू, प्री-लँडिंग ऑर्बिटमध्ये स्थानांतरित करण्यासाठी थ्रस्टर उघडायचा होता. Luna-25 च्या स्वयंचलित स्टेशनमध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, ज्याने त्याचे थ्रस्टर्स चालू करण्याची परवानगी दिली नाही.
21 किंवा 22 ऑगस्ट रोजी लुना-25 चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचेल अशी अपेक्षा होती. चांद्रयान-3 भारताने 14 जुलै रोजी प्रक्षेपित केले, जे 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरणार आहे. लुना-25 आणि चांद्रयान-3 चा चंद्रावर उतरण्याची वेळ जवळपास सारखीच असणार होती. परंतू, ससा - कासवाच्या या स्पर्धेत आता कोण पहिले उतरणार याची बाजी पलटली आहे.