Rafale Deal : राफेल व्यवहारात भारतीय मध्यस्थीला कोट्यवधींचं 'गिफ्ट'; फ्रेन्च रिपोर्टचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 10:22 AM2021-04-05T10:22:46+5:302021-04-05T10:23:54+5:30

Rafale Deal : दसॉच्या खात्यांच्या ऑडिटनंतर ही बाब समोर आल्याचा फ्रेन्च रिपोर्टचा दावा. फ्रान्सच्या अँटी करप्शन एजन्सीनं केलं ऑडिट

Rafale deal Dassault paid 1 million euros to Indian middleman as gift claims report | Rafale Deal : राफेल व्यवहारात भारतीय मध्यस्थीला कोट्यवधींचं 'गिफ्ट'; फ्रेन्च रिपोर्टचा दावा

Rafale Deal : राफेल व्यवहारात भारतीय मध्यस्थीला कोट्यवधींचं 'गिफ्ट'; फ्रेन्च रिपोर्टचा दावा

Next
ठळक मुद्देदसॉच्या खात्यांच्या ऑडिटनंतर ही बाब समोर आल्याचा फ्रेन्च रिपोर्टचा दावा.फ्रान्सच्या अँटी करप्शन एजन्सीनं केलं ऑडिट

भारत-फ्रान्सदरम्यान राफेल लढाऊ विमानाच्या व्यवहारामधील भ्रष्टाचाराचे आरोप पुन्हा एकदा बाहेर आले आहे. फ्रान्स पब्लिकेशननं राफेल तयार करणाऱ्या फ्रान्सच्या कंपनी दसॉनं भारतातील एका मध्यस्थाला गिफ्ट म्हणून एक दशलक्ष युरो दिले होते असा दावा केला आहे. फ्रान्समधील माध्यमाच्या या गौप्यस्फोटानंतर पुन्हा एकदा राफेल व्यवहाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे. 

२०१६ मध्ये जेव्हा भारत आणि फ्रान्सदरम्यान राफेल लढाऊ विमानांबाबत हा व्यवहार झाला त्यावेळी दसॉ या कंपनीनं भारतातील एका मध्यस्थीला ही रक्कम दिली होती. २०१७ मध्ये दसॉ ग्रुपच्या अकाऊंटमधून ५०८९२५ युरो 'गिफ्ट 'टू क्लायंट' या नावानं ट्रान्सफर करण्यात आले होते असा दावा फ्रान्समधील पब्लिकेशन 'मीडियापार्ट'नं आपल्या रिपोर्टमध्ये केला आहे. 

फ्रान्सच्या अँटी करप्शन एजन्सी AFA नं दसॉच्या खात्यांचं ऑडिट केलं. त्यावेळी ही बाब समोर आली. मीडियापार्टच्या रिपोर्टनुसार हा खुलासा झाल्यानंतर दसॉनं याबद्दल स्पष्टीकरण दिलं. तसंच या पैशांचा वापर राफेल लढाऊ विमानाचे ५० मोठे मॉडेल तयार करण्यासाठी झाला होता. परंतु अशी कोणती मॉडेल तयारच झाली नाही, असं त्यांनी सांगितलं. ऑडिटमध्ये ही बाब समोर आल्यानंतरही एजन्सीनं कोणतीही कारवाई केली नाही. हे फ्रान्समधील न्यायिक प्रक्रिया आणि राजकारणी एकत्र असल्याचं दाखवून देत असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. फ्रान्समध्ये २०१८ साली एक एजन्सी Parquet National Financier (PNF) नं या डीलमध्ये घोटाळा झाल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर हे ऑडिट करवण्यात आलं. त्या ऑडिटनंतर ही बाब समोर आली होती. 

प्रश्नांचं उत्तरच नाही

दरम्यान, दसॉ समुहानं गिफ्ट म्हणून दिलेल्या रकमेचा बचाव केला आहे. भारतीय कंपनी Defsys Solutions च्या एका इन्व्हॉईसवरून दाखण्यात आलं की जे ५० मॉडेल्स तयार करण्यात आले आहेत त्याचीच अर्धी रक्कम त्यांना देण्यात आली. प्रत्येक मॉडेलची किंमत जवळपास २० हजार युरो इतकी होती, असंही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. परंतु सर्व आरोपांसाठी दसॉकडे कोणतंही उत्तर नव्हतं. तसंच ही गिफ्ट केलेली रक्कम कोणाला आणि का दिली हेदेखील कंपनी सांगू शकली नाही. ज्या भारतीय कंपनीचं यात नाव घेण्यात आलं आहे ती यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या कंपनीचा मालक ऑगस्टा वेस्टलँड केसमध्ये तुरुंगातही जाऊन आले आहेत, असा दावा या रिपोर्टमधून करण्यात आला आहे.
 

Web Title: Rafale deal Dassault paid 1 million euros to Indian middleman as gift claims report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.