आक्रोश अन् संताप!
By admin | Published: December 17, 2014 02:44 AM2014-12-17T02:44:18+5:302014-12-17T02:44:18+5:30
पेशावर येथील निर्घृण हल्ल्याचा जगभरातल्या नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या घृणास्पद कृत्याचा संताप अनेक नेत्यांनी ट्विटर, तसेच अन्य माध्यमांतून व्यक्त केला
पेशावर येथील निर्घृण हल्ल्याचा जगभरातल्या नेत्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. या घृणास्पद कृत्याचा संताप अनेक नेत्यांनी ट्विटर, तसेच अन्य माध्यमांतून व्यक्त केला. धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या
दृष्टीने या घटनेकडे पाहायला हवे आणि जगातील दहशतवाद नष्ट करायला हवा असा सूर या नेत्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेतून व्यक्त केला. पाकिस्तानमध्येही याविरोधात संताप व्यक्त होत होता.
12:05 : पेशावर येथील आर्मी शाळेत दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यात पाच विद्यार्थ्यांसह सात जण जखमी झाले. सहा दहशतवादी शाळेत घुसल्याची पोलिसांची माहिती.
12:11 : तहरिक ए तालिबान संघटनेने स्वीकारली हल्ल्याची जबाबदारी.
12:13 : शाळेत गोळीबार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा. ५००हून अधिक विद्यार्थी व शिक्षक ओलीस.
12:20 : गोळीबारीत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि दहा जण जखमी झाल्याचे वृत्त धडकले.
12:25 : पाच ते सहा दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याच्या वृत्ताला पाकिस्तानी सैन्याकडून दुजोरा. बचावकार्याला ताबडतोब सुरुवात.
12:28 : तालिबानचा प्रवक्ता मुहम्मद उमर खोरासानी बरळला. म्हणे, ‘‘विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची हानी न पोहोचवता जवानांवर हल्ला करण्याची सूचना दिली आहे.’’
12:30 : आणखी दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू व २७हून अधिक जण जखमी.
12:35 : दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याचे प्रत्यक्षदर्शींची माहिती. गोळीबार सुरू होताच शाळेबाहेर पळापळ सुरू.
12:40 : दहशतवादी आणि सैनिकांच्या चकमकीत सैनिकाचा मृत्यू. जखमींचा आकडा ३५वर.
01:00 : अनेक विद्यार्थी व शिक्षकांची सुखरूप सुटका करण्यात आली.
01:07 : उत्तर वझिरीस्तान येथे सैनिकांनी केलेल्या हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी हा हल्ला केल्याचा तालिबानी संघटनेचा दावा.
01:10 : मृतांचा आकडा १८वर. मृतांमध्ये १५ विद्यार्थ्यांचा समावेश.
01:20 : १७ विद्यार्थ्यांसह २१हून अधिक मृत्युमुखी. ४५ जण जखमी.
01:43 : सुटका झालेल्या विद्यार्थ्यांनी दहशतवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्र असल्याचे सांगितले.
01:45 : शाळेतील मुख्य भाग आणि ज्युनिअर विभाग रिकामी करण्यात आला. सैन्याने पुढील कारवाईसाठी मोर्चा प्रशासकीय विभागाकडे वळवला.
02:10 : मृतांचा आकडा १०४वर पोहोचला. त्यात ८४ विद्यार्थ्यांचा समावेश
02:11 : पंतप्रधान नवाज शरीफ पेशावरच्या दिशेने रवाना.
03:18 : शाळेत दोन स्फोट.
03:35 : पाकिस्तानातील रेडिओ वृत्तानुसार मृतांची संख्या १२६वर पोहोचली.
03:47 : शाळेत आणखी एक स्फोट.
04:10 : पाचव्या दहशतवाद्याला ठार मारण्यात सैनिकांना यश.
05:20 : सहावा दहशतवादी ठार.