Grammarly Rahul Roy Chowdhury : लै भारी! दिग्गज परदेशी कंपनीच्या CEO पदी भारतीयाची वर्णी, कोण आहेत राहुल रॉय चौधरी?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 02:49 PM2023-03-23T14:49:12+5:302023-03-23T14:50:24+5:30
जगभरातील अनेक दिग्गज कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीय व्यक्ती कार्यरत आहे.
Grammarly Rahul Roy Chowdhury : गेल्या काही वर्षांपासून भारतीयांचा जगभर डंका वाजत आहे. Google पासून Microsoft पर्यंत, अनेक मोठ्या कंपन्यांच्या प्रमुखपदी भारतीय व्यक्ती बसलेला आहे. आता आणखी एक परदेशी कंपनीच्या प्रमुखपदी भारतीय व्यक्तीची वर्णी लागली आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधून कार्यरत असलेल्या Grammarly च्या CEOपदी राहुल रॉय रॉय चौधरी यांची नियुक्ती झाली आहे.
कंपनीचे ग्लोबल हेड आहेत राहुल रॉय चौधरी
राहुल रॉय चौधरी सध्या ग्रॅमरलीमध्ये ग्लोबल हेड ऑफ प्रॉडक्ट आहेत. Grammarly चे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रॅड हूवर यांनी आपल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती शेअर केली आहे. हूवरने लिहिले, 'आम्ही आमचे प्रोडक्ट आणि बिझनेसबाबत नवीन वळणावर आहोत. आम्हाला वेगाने पुढे जाण्याची गरज आहे. नवीन नेतृत्व या वळणावर कंपनीला पुढे नेण्यासाठी उपयुक्त ठरेल. 12 वर्षे कंपनी हाताळल्यानंतर आता मी कंपनीची जबाबदारी राहुल रॉय-चौधरी यांच्याकडे सोपवत आहे. 1 मे 2023 पासून ते कंपनीची सूत्रे हातात घेतील.'
कोण आहेत राहुल रॉय चौधरी?
राहुल रॉय चौधरी हे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि हॅमिल्टन कॉलेज सारख्या मोठ्या संस्थांचे विद्यार्थी आहेत. मार्च 2021 मध्ये त्यांनी ग्रॅमरलीमध्ये सुरुवात केली. ग्रॅमरलीमध्ये येण्यापूर्वी त्यांनी Google आणि Amazon सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये महत्त्वपूर्ण पदे भूषविली आहेत. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी Google मध्ये सर्वात जास्त काळ घालवला.