रेल्वे मंत्र्यांना वैतागून अधिकाऱ्याने मागितली 730 दिवसांची रजा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 01:11 PM2018-08-28T13:11:11+5:302018-08-28T13:11:49+5:30

रेल्वेमंत्र्यांच्या कार्यपद्धतीला वैतागलेल्या एका अधिकाऱ्याने चक्क 730 दिवसांच्या भरपगारी रजेसाठी अर्ज केला आहे.

Railway employee have asked for 730 days leave | रेल्वे मंत्र्यांना वैतागून अधिकाऱ्याने मागितली 730 दिवसांची रजा

रेल्वे मंत्र्यांना वैतागून अधिकाऱ्याने मागितली 730 दिवसांची रजा

Next

 इस्लामाबाद - अनेक कार्यालयातील कर्मचारी आपल्या वरिष्ठांना वैतागलेले असतात. अगदी सरकारी कार्यालयेही याला अपवाद नाही. त्यात मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये होणारी खडाखडी तर नेहमीचीच. मात्र रेल्वेमंत्र्यांच्या कार्यपद्धतीला वैतागलेल्या एका अधिकाऱ्याने चक्क 730 दिवसांच्या भरपगारी रजेसाठी अर्ज केला आहे. या अधिकाऱ्याच्या रजेचा अर्ज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा प्रकार पाकिस्तानमधील असून, नवे रेल्वेमंत्री शेख रशिद अहमद यांच्यासोबत काम करणे अशक्य असल्याचे सांगत कर्मचारी हनिफ गुल या अधिकाऱ्याने मंत्रालयाच्या सचिवांकडे रजेसाठी अर्ज केला आहे. पाकिस्तानमधील जियो टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार हनिफ गुल हे पाकिस्तान रेल्वेमधील ग्रेड-20 अधिकारी आहेत. 





 सध्या हनिफ हे रेल्वेमध्ये मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. " रेल्वेमंत्री शेख रशिद अहमद यांची कार्यपद्धती व्यावसायिक दृष्टीकोन असलेली नाही. तसेच त्यांचे वर्तनही चांगले नाही. पाकिस्तानच्या सिव्हिल सेवेमधील एक सन्मानित सदस्य म्हणून त्यांच्या हाताखाली काम करणे मला शक्य होणार नाही. त्यामुळे मी रजेसाठी अर्ज करत आहे, असे हनिफ यांनी रजेच्या अर्जात म्हटले आहे. 

हनिफ गुल यांचा रजेचा अर्ज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. पाकिस्तानमधील नामांकित पत्रकारांनी हा अर्ज शेअर केला आहे. अनेक जण त्यांचे समर्थन करत आहेत. तर अनेकांनी रजेच्या कालावधीवरून त्यांच्यावर टीका केली आहे.  



 

Web Title: Railway employee have asked for 730 days leave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.